पुणे : शहरातील कात्रज येथील डी-मार्टच्या जवळ लागलेल्या आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी घडली. या आगीत दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे तीनही झोपड्यांचे अवशेष उरले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज जवळील डी मार्टच्या अलीकडे असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या अलीकडे तीन झोपड्या आहेत. इथे राहणाऱ्या व्यक्ती रोजंदारीवर कामाला जात असल्यामुळे आग लागली तेव्हा कोणीही घटनास्थळी नव्हते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुरुवातीला आग लागल्यावर पहिल्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर काहीच वेळात दुसऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके म्हणाले की, 'घटनास्थळापासून कात्रजचे अग्निशमन केंद्र अगदी थोड्या अंतरावर आहे. मात्र वर्दी उशिरा मिळाल्यामुळे आगीचे स्वरूप वाढले. लवकर समजले असते तर आग लवकर नियंत्रणात आणून नुकसान टाळता येणे शक्य होते.