पुणे: कोंढवा बुद्रुक येथील तालाब कंपनीजवळ शुक्रवारी (दि.१५) पहाटेच्या सुमारासच्या प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत सुदॅवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचे मोठे नुकसान मात्र झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक सोमजी पेट्रोल पंपा मागील प्लास्टिकच्या गोडाऊनला शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीची माहिती कोंढवा बुद्रुक येथील अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना अर्ध्या तासाच्या कालावधीत यश मिळाले.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र,प्लास्टिकच्या गोडाऊनमधील साहित्य आगीत जळून खाक झाले.आग विझवण्यात गणपत पडये,योगेश जगताप, सोपान कांबळे, तेजस खरीवले,अभिजित थाळकर, सौरभ नगरे, प्रदीप कोकरे,विशाल गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले.
पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 1:05 PM
कोंढवा बुद्रुक सोमजी पेट्रोल पंपामागील प्लास्टिकच्या गोडाऊनला शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली.
ठळक मुद्देअर्ध्या तासाच्या कालावधीत आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश