पुणो : पुणो रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीमधील पहिल्या मजल्याला लागलेल्या आगीत शनिवारी सहा मोठय़ा खोल्या जळून खाक झाल्या. या खोल्यांमध्ये मिलिटरीकंट्रोल ऑफिस व रेल्वे रेकॉर्ड (कागदपत्रे) ठेवण्यात आले होते. सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारस ही घटना घडली. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकले नाही.
आग लागलेली इमारत ही हेरिटेज म्हणून घोषित करण्यात आली होती. ही इमारत 27 जुलै 1925 रोजी बांधून पूर्ण झाली होती. या इमारतीचे छत पूर्णपणो सागवानी लाकूड आणि कौलारू आहे. त्यामुळे या आगीत इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नाही; परंतु कागदपत्रंचे व फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास समजताच आग्निशमन दलाच्या दोन गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे स्वरूप मोठे असल्यामुळे, अग्निशमन दलाच्या अधिका:यांनी आणखी गाडय़ा पाठविण्याचे नियंत्रण कक्षाला सांगितले. त्यानंतर 8 गाडय़ा घटनास्थळी पाठविण्यात आल्या.
सायंकाळी गर्दीच्या वेळी आग लागल्यामुळे, रेल्वे स्थानकावर प्रवाशांची धावपळ झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळच्या इमारतीला आग लागल्यामुळे, प्रवाशांनी व बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पूर्णपणो रिकामा करण्यात आला. आग लष्काराच्या कार्यालजवळ लागली होती. त्यामुळे लष्कराचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, रेल्वे स्थानकावरील प्रवेशद्वार बंद करण्यात आले. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून जाणारी पुणो-पटना एक्स्प्रेस प्लॅट फॉर्म क्रमांक 3 वरून पाठविण्यात आली. अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, सहायक अधिकारी रमेश गांगड, विजय भिलारे, प्रकाश गोरे यांच्या नेतृत्वाखाली 4क् जवानांनी आग विझवली.(प्रतिनिधी)
इमारतीला आग लागण्यापूर्वी इमारतीमधील खोलीमधून धुराचे लोट बाहेर येत असलेले एका लष्कराच्या अधिका:याने पाहिले. त्याने रेल्वे प्रशासनाला ही माहिती दिल्यानंतर, अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक नागरिक व प्रवाशांनी मदत केली. तसेच, आरपीएफच्या जवानांनी प्रवाशांची गर्दी नियंत्रित केली.
आग लागलेल्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष व कागदपत्रे अधिक प्रमाणात होती. या सर्वबाबींचे नुकसान होऊ नये म्हणून पाण्याचा कमी वापर करून, आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आग विझली असली, तरी सावधगिरी म्हणून अग्निशमन दलाच्या दोन
गाडय़ा रात्रभर रेल्वे स्थानकावर ठेवल्या जाणार आहेत.
- प्रकाश गोरे,
अग्निशमन दल अधिकारी.
पहिल्या मजल्यावर पोलिसांचे कार्यालय आहे. त्या शेजारी असलेल्या खोल्यांमध्येच आग लागली. पोलिसांच्या कार्यालयाला आग लागी नाही. त्यामुळे पोलिसांच्या रेकॉर्डचे कोणतेही नुकसान झाले नाही.
- अभय परमार,
पोलीस निरीक्षक,
रेल्वे पोलीस ठाण्याचे.