पुणे : येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बाेस शाळेजवळील एका चहाच्या स्टाॅलवरील सिलेंडरला लागलेली अाग पसरल्याने या अागीत स्टाॅलशेजारील सिट कव्हरचे दुकान जळून खाक झाले. दुकानात असलेल्या फाेम व रेक्जिनमुळे अाग माेठ्या प्रमाणावर भडकली. अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत 15 मिनिटात अागीवर नियंत्रण मिळवले. या अागीत कुठलिही जीवित हानी झाली नाही.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बाेस शाळेजवळच्या पदपथावर चहाचा स्टाॅल अाहे. त्या चहा स्टाॅलवरील व्यक्तीने गॅस संपला म्हणून दुसरा गॅस लावला. एक बर्नर पेटवल्यानंतर अचानक गॅसच्या रेग्युलेटरच्या येथे अाग लागली. क्षणार्धात अाग भडकल्याने या स्टाॅलशेजारील एका सिट कव्हरच्या दुकानाला अागीने वेढले. या अागीत या दुकानातील सामान जळून खाक झाले. दुपारी 1.58 च्या सुमारास अग्निशामक दलाला अाग लागल्याचा फाेन अाला. येरवडा अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनस्थळी धाव घेत अाग विझविण्यास सुरुवात केली. त्यांच्या मदतीला दयाराम राजगुरु अग्निशामक केंद्राच्या 2 फायर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दुकानातील सामानामुळे अाग माेठ्याप्रमाणात भडकली हाेती. अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करत 15 मिनिटात अाग अाटाेक्यात अाणली. फाेम व रेक्झिन सारखे पदार्थ दुकानात असल्याने अाग पुन्हा भडकू नये म्हणून कुलिंग अाॅपरेशन करण्यात अाले. दाटीवाटीचा भाग असल्याने इतर दुकानांना अाग लागू नये याची खबरदारी अग्निशामक दलाच्या जवानांनी घेतली.
येरवडा व दयाराम राजगुरु अग्निशामक दलाच्या 10 ते 12 जवानांनी ही अाग अाटाेक्यात अाणली.