भोर : अंधश्रद्धा निर्मूलन समिती भोर, भारतीय जैन संघटना यांच्या वतीने भोर तालुक्यात फटाकेमुक्त दिवाळी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला १८ शाळांमधील ३६४८ मुलांनी सहभाग घेऊन सुमारे २५ लाख ७३ हजार रुपये फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून वाचवले.
फटाक्यांमुळे बालकामगारांना धोकादायक कारखान्यात काम करावे लागणे, घराला आग लागणे, वृद्धांचा बहिरेपणा वाढणे, हृदयविकार होणे, हाता-पायाला इजा होणे, प्रदूषण या सारख्या समस्या उद्भवतात. यामुळे भोर तालुक्यातील प्रत्येक शाळेत जाऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जैन संघटनेच्या कॉ. ज्ञानोबा घोणे, डॉ. अरुण बुरांडे, किसन रोमण, विवेक पोळ, संतोष देशमाने, जमीर आतार, सविता कोठावळे यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे ८५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन १८ शाळांतील ३ हजार ७४८ मुलांनी सुमारे २५ हजार ७३ हजार ६२० रुपयांची बचत करुन फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. यावर्षी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुढच्यावर्षी पासून मोठ्या प्रमाणात फटाके न फोडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जाणार आहे.