पुणे - पौड (ता. मुळशी) येथे माथाडी कामगार पुरविण्याच्या वादातून दि. १० जुलै रोजी दशरथ बाळू चव्हाण याच्यावर गोळीबार करण्यात आला.फिर्यादीनुसार आरोपी रोहित उर्फ बाबू बाळासाहेब बलकवडे, शेखर उर्फ दाद्या बाळासाहेब बलकवडे व श्रीवर्धन उर्फ दाद्या रमेश तिकोने व तीन चार जण (रा.सर्वजण सुवेर्वाडी) यांनी संगनमताने दशरथ चव्हाण याला जिवे मारण्याच्या हेतूने रात्री ९.३० ते १० च्या सुमारास घराच्या दिशेने गोळीबार केला. तसेच आरोपींनी चव्हाण यांच्या घराचा दारे-खिडक्या व मोटारसायकल यांचे दगड, विटा व लाकडाने मारून नुकसान केले आहे. यावेळी आरोपींना थांबविण्यासाठी गेलेल्या सूरज पिंगळे व निखिल रुकर यांच्यावरही आरोपीनी शस्त्राने हल्ला केल्या.या घटनेतील गोळीबार करणारे हे माथाडी कामगार संघटनेशी संबधित असून त्यांचा पौड पिरंगुट भागात कामगार पुरविण्याचा व्यवसाय आहे. यातील रमेश तिकोने व रोहित उर्फ बाबू बलकवडे यांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या विरोधात बेकायदा शस्त्र बाळगणे, जमाव जमवून दहशत माजवणे, खुनी हल्ला करणे या कारणावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पौड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ए.डी.गिजे हे करीत आहेत.आरोपीवर या अगोदर अशा स्वरूपांच्या गुन्ह्यांची नोंद.सोÞडवायला गेलेल्यांवर देखील गोळीबार.गोळीबार करणारे हे माथाडी कामगार संघटनेशी संबधित असून त्यांचा कामगार पुरविण्याचा व्यवसाय आहे.
कामगार पुरविण्याच्या भांडणातून गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 1:55 AM