पुणे : रावण टोळीतील सदस्याविरोधातील खटल्यात साक्ष देण्यासाठी आलेल्या महाकाली टोळीतील लोकांना धमकावून हवेत गोळीबार करण्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर येथील न्यायालयाजवळ घडली़ याप्रकरणी पोलसांनी रावण टोळीतील अक्षय साबळे, रोहन चंडलिया आणि त्याच्या एका साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ अक्षय साबळे याच्यावर देहूरोडमधील एका गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे़ तेव्हापासून तो फरार आहे़याप्रकरणी सिद्धेश्वर शर्मा (वय २१, रा़ देहूरोड) याने फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, शर्मा व त्याचे साथीदार महाकाली गँगचे सदस्य आहेत़ दरोड्याच्या तयारीत असताना रावण टोळीत काही जणांना पोलिसांनी पकडले होते़ त्या खटल्यात सुरेश वाघमारेंची शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात साक्ष होती़ न्यायालयातून दुपारी ते बाहेर आले़ शर्मा, सुरेश वाघमारे, गिरी, प्रतीक डोके असे काही जण न्यायालयाबाहेरील स्टॉलवरून वडापाव घेऊन जवळच्या एका झाडाखाली थांबले होते़ त्यावेळी दुचाकीवरुन तिघे जण आले़ त्यांनी यांना साक्षीवरुन धमकावले़ तेव्हा ते घाबरुन रेल्वेलाइनवरुन पुणे स्टेशनच्या दिशेने पळून जाऊ लागले़दुचाकीवरून ते तिघे रस्त्याने येत असताना चंडालिया याने त्यांच्या दिशेन गोळीबार केला़ त्यानंतर ते पळून गेले़ या घटनेची माहिती मिळताचवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली़
देहूरोडच्या २ टोळ्यांत पुण्यात गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 1:23 AM