पुणे : सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलमध्ये अत्याधुनिक थ्रीडी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित तारांगण पुणे महानगरपालिकतर्फे उभारण्यात आले आहे. हे शहरातील पहिलेच थ्रीडी तारांगण असणार आहे. या तारांगणचा शहर व बाहेरून येणा-या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगलाच उपयोग होईल. या स्व. विलासरावजी देशमुख थ्रीडी तारांगणाचे उद्घाटन येत्या १ मे रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरसेवक आबा बागूल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते. याबाबत मुक्ता टिळक म्हणाल्या, या प्रकल्पासाठी साडे तीन कोटी रुपयांचा खर्च आला आहे. विद्यार्थ्यांना अत्यंत कमी दरामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या सभेत दर निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान या तारांगणामुळे शहराच्या पर्याटनामध्ये देखील भर पडणार असून शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच बाहेर गावांवरुन पुण्यात सहलीसाठी येणा-या विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ घेता येणार आहे.
सहकारनगरमध्ये शहरातील पहिले ‘ थ्रीडी तारांगण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 6:47 PM
थ्रीडी तारांगणामुळे शहराच्या पर्याटनामध्ये देखील भर पडणार असून शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच बाहेर गावांवरुन पुण्यात सहलीसाठी येणा-या विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ घेता येणार आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना अत्यंत कमी दरामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार