पुणे : संपूर्ण राज्यभरात पूजा चव्हाणच्या आत्महत्येचा विषय गाजत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करणारा एक खासगी खटला येथील लष्कर न्यायालयात शुक्रवारी (दि.26) दाखल झाला आहे. या खटल्यावर 5 मार्च रोजी निकाल होणार आहे.
लिगल जस्टिस सोसायटीतर्फे अँड. भक्ती पांढरे यांनी खटला दाखल करून घेण्यासाठी लष्कर न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांच्या न्यायालयात हा खटला दाखल झाला आहे. वानवडी परिसरामध्ये पूजा चव्हाणने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी सातत्याने होत असतानाही पंधरा दिवस उलटले तरी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्यता बाहेर येण्यासाठी आम्ही हा खटला दाखल केला असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष अँड.विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले. या प्रकरणाशी महाआघाडीमधील एका मंत्र्यांचे नाव जोडले जात आहे. काही व्हिडिओ क्लिपही बाहेर आल्या आहेत. मात्र न्यायालयात खटला दाखल करताना कुणाचेही नाव न घेता अज्ञात व्यक्तीविरूद्ध हा खटला दाखल करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.-----------------------------------------------------------------------------------------------------------’’ पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येची जी घटना घडली आहे. त्यात पोलिसांना वारंवार तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.विविध सामाजिक संघटना, पक्ष सर्वांमध्येच या घटनेबाबत संभ्रम कायम आहे.रजिस्टर गायब होणे किंवा व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होणे याबाबत पोलीस कोणतीच कारवाई करताना दिसून येत नाही. आमच्याही अर्जावर पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्यामुळे आम्ही स्वत:हून कोर्टात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना आदेश होणे गरजेचे असल्याचे दाखल खटल्यात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावे समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाने तपासकामात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचे दिसून येत आहे- अँड. विजयसिंह ठोंबरे, अध्यक्ष लीगल जस्टिस सोसायटी. ----------------------------------------------------------------------------------------------------------कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो?पूजा यांना कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले असेल तर त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०६ नुसार तर इमारतीवरून कुणी ढकलून दिले असेल तर आरोपींवर ३०२ कलम म्हणजे खूनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.-----------------------------------------------------