Ajit Pawar: ‘फर्स्ट क्लास, बेस्ट...! चित्रकाराने कागदावर हुबेहुब रेखाटले ‘अजितदादा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:11 IST2025-04-11T19:11:36+5:302025-04-11T19:11:55+5:30
अतुल गायकवाड या चित्रकाराने अवघ्या काही मिनिटांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समोर बसवत त्यांची प्रतिमा कोऱ्या कागदावर रेखाटली

Ajit Pawar: ‘फर्स्ट क्लास, बेस्ट...! चित्रकाराने कागदावर हुबेहुब रेखाटले ‘अजितदादा’
बारामती : नटराज नाट्य कला मंदिर बारामती यांच्या माध्यमातून कलाकारांच्या कलाकृतींना व्यासपीठ मिळावे. यासाठी चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले. प्रदर्शनात विविध कलाशिक्षकांनी त्यांची कला अजित पवार यांच्यासमोर सादर केली. यावेळी अतुल गायकवाड या चित्रकाराने अवघ्या काही मिनिटांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समोर बसवत त्यांची प्रतिमा कोऱ्या कागदावर रेखाटली. ही कलाकृती पाहून पवार भारावले. ‘फर्स्ट क्लास, बेस्ट’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करीत पवार यांनी चित्रकार गायकवाड यांचे काैतुक केले.
चित्रकार गायकवाड व व्यंगचित्रकार शिवाजी गावडे यांनी अजित पवारांचे काही क्षणात रेखाटलेले चित्र पाहून अजित पवारांनी दोघांचेही कौतुक केले. बारामतीत नटराज नाट्य कलामंदिराच्या माध्यमातून वतीने नटराज नाट्य कला मंडळाचे प्रमुख किरण गुजर यांच्या संकल्पनेतून बारामतीतील कलाकारांना कलाकार कट्टा नावाचे मोफत व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याठिकाणी कलाकारांना विविध सुविधाही पुरवल्या जातात. या पार्श्वभूमीवर कलाकार कट्टा येथे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.