आधी संसदेत टीका, आता 'अजितदादांविरोधात कधीच बोललो नाही'; सुप्रिया सुळेंचा युटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 06:46 PM2023-09-24T18:46:52+5:302023-09-24T18:48:28+5:30

काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता टीका केली होती.

First criticized in Parliament, now 'never spoke against Ajit Dada' Uturn of Supriya Sule | आधी संसदेत टीका, आता 'अजितदादांविरोधात कधीच बोललो नाही'; सुप्रिया सुळेंचा युटर्न

आधी संसदेत टीका, आता 'अजितदादांविरोधात कधीच बोललो नाही'; सुप्रिया सुळेंचा युटर्न

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या विशेष अधिवेसनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करत घोटाळ्याची मागणी केली होती. ही टीका अजित पवार यांच्यावर केल्याची चर्चा सुरू होती. या वक्तव्याची चर्चा जोरदार झाली होती. आता यावर त्यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. सुळे यांचं हे वक्तव्य अजित पवारांवर निशाणा साधला असल्याचं बोललं जात होतं. 

लालूप्रसादांशी बिनसले? नितीशकुमार राबडी देवींच्या घरी १० मिनिटे थांबून न भेटताच परतले...

खासदार सुप्रिया सुळे आज गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी पुण्यात होत्या. यावेळी माध्यमांनी त्यांना संसदेतील भाषणावर प्रश्न उपस्थित केला. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजितदादा हे माझे मोठे भाऊ असून त्यांच्या विरोधात मी कधीच काही बोलले नाही. मी संसदेत जे काही बोललो ते कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विधानाच्या विरोधात बोलले असल्याचे सुळे म्हणाल्या.

संसदेचे विशेष अधिवेशन झाले. यावेळी सुळे यांनी भाजप सरकारवर आरोप केले होते. महिला आरक्षण विधेयकावर संसदेत बोलताना सुळे म्हणाल्या होत्या की, प्रत्येक घरात भाऊ नसतो ज्याला बहिणीचे कल्याण पहायचे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या १० वर्षांपासून आपल्या पक्षावर टीका करत आहेत, मात्र आता ते राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्ट पक्ष असल्याचे सांगत नाहीत.

'भाजपने नेहमीच सूडाचे राजकारण केले आहे. आमच्यावर केलेले आरोप खरे असतील तर आमची चौकशी झाली पाहिजे आणि आरोप खोटे ठरले तर भाजपने आमची माफी मागावी, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

Web Title: First criticized in Parliament, now 'never spoke against Ajit Dada' Uturn of Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.