पुणे : ‘लोकमत’तर्फे दिवाळी उत्सव अंकासाठी जाहीर केलेल्या जिल्हास्तरीय कथा स्पर्धेत आरती शृंगारपुरे यांच्या ‘चिऊचं घर मेणाचं’ या कथेला पहिला क्रमांक मिळाला. रमेश पिंजरकर यांच्या ‘दिव्यांग दर्शन’ या कथेला दुसरा व सुवर्णा पवार यांच्या ‘लाल रिबीन’ या कथेने तिसरा क्रमांक पटकावला.दिवाळी अंक उत्सव २०१७ यासाठी ही स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. अल्पावधीतच शंभरपेक्षा जास्त लेखकांचा प्रतिसाद स्पर्धेला मिळाला. कथा या साहित्यप्रकाराला अजूनही अनेक चाहते असल्याचे त्यावरून दिसून आले. निसर्ग, पर्यावरण, नातेसंबंध, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अशा अनेक विषयांवरील कथा प्राप्त झाल्या. शासकीय अधिकाºयांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत समाजातील सर्व घटकांचा त्यात समावेश होता. विषय, आशय, मांडणी, शब्दकळा, विश्लेषण असे निकष लावून कथांची निवड करण्यात आली.स्पर्धेचा सविस्तर निकालजिल्हास्तरीय कथा स्पर्धाप्रथम क्रमांक : आरती शृंगारपुरे कथेचे नाव : चिऊचं घर मेणाचं़़़द्वितीय क्रमांक : रमेश पिंजरकर कथेचे नाव : दिव्यांग दर्शनतृतीय क्रमांक : सुवर्णा पवार कथेचे नाव : लाल रिबीनउत्तेजनार्थविजय य. सातपुतेकथेचे नाव : हजबन्ड इन लॉयोगेश गोखलेकथेचे नाव : इच्छामरणशंतनू चिंचाळकरकथेचे नाव : जाणीव
लोकमत कथा स्पर्धेत ‘चिऊचं घर मेणाचं’ प्रथम, ‘दिव्यांग दर्शन’ द्वितीय, ‘लाल रिबीन’ तृतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:40 AM