पुणे : गर्भवतीच्या पाेटातील बाळाला अनुवांशिक कॅन्सर त्याचे प्रकार व इतर आजारांचे निदान आता ते बाळ जन्माला येण्याआधीच जेनेटिक तपासणीद्वारे हाेणार आहे. त्यामुळे ताे गर्भपात करून अशा बाळाचा जन्मच टाळता येणार आहे. कारण, महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विदयापीठातर्फे (एमयुएचएस) ही तपासणी करणारी महाराष्ट्रातील पहिली शासकीय ‘जेनेटिक लॅब’ पुण्यात महिन्याभरात सूरू हाेत आहे. त्यामुळे, ज्या तपासण्यांसाठी खासगींमध्ये ५० हजार ते दाेन लाख रूपये लागतात त्या तपासण्या गरीबांसाठी माेफत तसेच अवघ्या ५ ते १० हजारांत हाेतील.
शिवाजीनगर येथील विदयापीठ रस्त्यावरील डाॅ. घारपुरे मेमाेरियल बंगल्यात ही लॅब सूरू करण्यात आली आहे. त्याला डाॅ. घारपुरे मेमाेरियल जेनेटिक लॅब ॲंड कॅन्सर रिसर्च सेंटर असे नाव देण्यात आले आहे. या लॅबद्वारे आईच्या रक्ताच्या नमुन्यांदवारे तसेच बाळाच्या नमुन्यांद्वारे बाळाला थॅलेसेमिया (रक्ताच्या कॅन्सर एक प्रकार), मस्क्यूलर डिस्ट्राॅफी (स्नायुंचा कमकुवतपणाचा विविध राेगांचा गट असलेला अनुवांशिक आजार), क्राेमाेझाेमाेनल अॲब्नाॅर्मिलीटी (गुणसूत्रांची विकृती) व पेशींमधील विकृती शाेधणारी ‘फिश’ चाचणी अशा बाळांमधील जन्मजात विकृती ओळखण्यासाठी या चाचण्यांचा उपयाेग हाेणार आहे. एमयुएचएसच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या पुढाकारातून ही प्रयाेगशाळा सूरू करण्यात येत आहे.
त्याचबराेबर डाऊन सिंड्रोमसारख्या समस्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या गर्भवती मातांची तपासणी (एनआयपीटी) प्रयोगशाळेत केली जाणार आहे. तपासणीतील नमुन्यांवरुन बाळामध्ये काही व्यंग असेल की नाही, याचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे. अशा पध्दतीच्या महिन्याला 700 हून अधिक तपासण्या करणे शक्य होणार आहे, अशी माहिती मॉलिक्युलर ऑनकॉलॉजिस्ट तथा या प्रयाेगशाळेच्या प्रमुख डॉ. अनुराधा चौगुले यांनी दिली. कर्करोगावर औषध, उपचारपध्दतीतील संशोधनाला चालना मिळावी आणि सामान्य लोकांना चाचण्या रास्त दरांत उपलब्ध व्हाव्यात असा या लॅबाचा उददेश आहे. तसेच कॅन्सरशी संबंधित संशोधनावर प्रयोगशाळेत भर दिला जाणार आहे.
या हाेणार तपासण्या- मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोकेमिकल आणि कायटोजेनेटिक टेस्ट, कॅरिओटायपिंग, फिश, न्यु बॉर्न स्क्रिनिंग, एचपीएलसी फॉर थॅलेसमिया, कार्डिअॅक रिस्क पॅनल, डायबेटिक रिस्क पॅनेलप्रयाेगशाळेचे वैशिष्टये :- महाराष्ट्रातील पहिली शासकीय जेनेटिक लॅब- दरराेज ३० ते ९० नमुन्यांच्या तपासण्यांची क्षमता- माेफत तसेच ५ ते १० हजारांचा खर्च- संपूर्ण राज्यातील ४८ शासकीय रुग्णालयांमधून नमुने येणार- खासगी रुग्णालयांतून नमुने तपासणीसाठी स्वीकारणार- तपासण्यांसह संशाेधन व ॲकॅडमिक प्राेग्रामही चालवणार- टाटा कॅन्सरमधील तज्ज्ञांचा समावेश
ही लॅब पूर्णपणे एमयुएचएस द्वारे उभी करण्यात आली आहे. थॅलेसेमिया, कर्करोग आणि जन्मजात विकृतींसह अनेक गंभीर आजारांचा शोध घेणारी ही पहिली अनुवांशिक प्रयोगशाळा आहे. येथे वैद्यकीय तसेच जैविक शास्त्राच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयोगशाळेत अभ्यासक्रम असतील. भारतात प्रथमच, नवीनतम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आधारित प्रशिक्षण दिले जाईल. महिन्याभरात ती सूरू हाेईल."- लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, एमयुएचएस