पुणे : अकरावी प्रवेशाची प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरी सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होत आहे. या फेरीवर विद्यार्थी पालक सहाय्य संघाकडून आक्षेप घेण्यात आले आहेत. यामुळे चांगले गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, त्यामुळे याऐवजी पूर्ववत फेºया राबविण्याची मागणी होत आहे.
अकरावीच्या नियमित व विशेष फेºया पार पडल्यानंतर आता प्रथम येणाºया प्रथम प्राधान्य ही फेरी राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालयांच्या रिक्त जागांवर जो सर्वात पहिल्यांदा क्लिक करेल त्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे चांगले गुण मिळविणाºया तसेच इंटरनेट सुविधांची उपलब्धता नसलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची भीती विद्यार्थी पालक सहाय्य संघाचे आकाश शिंदे यांनी व्यक्त केली आहे. सोमवार, २७ आॅगस्ट रोजी ८० ते १०० टक्के दरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध असेल. यामध्ये रिक्त जागेवर सर्वात पहिल्यांदा क्लिक करणाºया विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होत जातील. यानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २७ ते २८ आॅगस्ट दरम्यान प्रवेश घ्यायचे आहेत. रिक्त राहिलेल्या जागांची यादी २८ आॅगस्ट रोजी जाहीर होईल. दुसºया प्रवर्गातील ६० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना २९ ते ३० आॅगस्टदरम्यान प्रवेशाची संधी असेल. त्यानंतर ३० आॅगस्ट रोजी शिल्लक जागांची यादी जाहीर होईल. तिसºया प्रवर्गातील ३५ ते ६० टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळेल.प्रवेशाबाबत प्रभारी उपसंचालिका मिनाक्षी राऊत यांनी सांगितले, मागील वर्षीपासून ही फेरी राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध असणार आहे. ज्यांचे प्रवेश एक -दोन गुणांनी हुकले होते, त्यांना यामध्ये प्रवेश मिळू शकेल.’
पहिला प्रवर्ग ८० ते १०० टक्के, दुसरा प्रवर्ग ६० ते ८० टक्के व तिसरा प्रवर्ग ३५ ते ६० टक्के यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत. या फेरीमध्ये प्रवेश घेऊन रदद् करणारे, प्रथम प्राधान्याचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे, प्रवेश न मिळालेले अशा सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे