राजगड कारखान्याने चालू गळीत हंगामात दिनांक ५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत १० लाख ६ हजार २१५ मेट्रिक टन ऊस गाळप करून सरासरी ९.५ टक्के साखर उताराने ९६ हजार ८२५ साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे दिनांक १५/१/२०२१ अखेर केलेल्या उसाला पहिला हप्ता म्हणून २२०० रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे दिनांक १७/२/२०२१ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे, सध्या कारखान्याचा गळीत हंगाम नियोजनानुसार सुरू असून, एप्रिल २०२१ अखेर कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप करून गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे
कारखान्याने उभारलेल्या नवीन इथेनॉल प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात झाली असून, २ लाख २६ हजार लिटर इथेनॉल होईल कंपन्यांना पुरवठा केलेला आहे. मे २०२१ ४३३७२६० लिटर पुरवठ्याचे उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. कारखाना ऊस उत्पादक सभासद व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला सर्व ऊस राजगड सहकारी साखर कारखान्यात देऊन सहकार्य करावे, असे आव्हान कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे.