पुणे : तरुण आणि सेल्फी म्हणजे आता एक समीकरणच झाले आहे. कुठलाही क्षण असाे तरुण सेल्फी घेण्यास विसरत नाही. अनेक ठिकाणी खास सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पाॅईंट तयार केलेले असतात. असाच पुण्यातील माॅर्डन महाविद्यालयात सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आला आहे. या पाॅईंटवर राेज विविध सामाजिक संदेश लिहीण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सेल्फी काढून ते अपलाेड करावेत असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.
या सेल्फी पाॅईंटवर सर्वप्रथम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उद्य सामंत यांनी सेल्फी काढला. यावेळी त्यांच्यासाेबत प्राेग्रेसिव्ह एज्युकेशन साेसायटीचे अध्यक्ष गजानन एकबाेटे आणि नगरसेविका ज्याेत्स्ना एकबाेटे देखील हाेत्या. माॅर्डन महाविद्यलयाच्या शिवाजीनगर येथील कॅम्पसमध्ये हा सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आला आहे. तेथे राेज वर्षभर विविध सामाजिक संदेश लिहीण्यात येणार आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सेल्फी घ्यावेत अशी महाविद्यालयाची अपेक्षा आहे. तरुणांमध्ये विविध सामाजिक संदेशाच्या माध्यमातून जागृती निर्माण व्हावी हा या उपक्रमामागील हेतू आहे.