पुणे : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामायिक परीक्षेमध्ये (सीईटी) पीसीबी या गटामध्ये अभिजित कदम हा २०० पैकी १८८ गुण मिळवून तर पीसीएम या गटामध्ये आदित्य अभंग हा २०० पैकी १९५ गुण मिळवून प्रथम आले आहेत. विद्यार्थ्यांना आज (रविवार, दि. ३ जून) आॅनलाईन त्यांच्या लॉग इनमधून हा निकाल पाहता येणार आहे.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आनंद रायते यांनी सीईटीच्या निकालाची शनिवारी घोषणा केली. एमएच-सीईटी २०१८ या परीक्षेसाठी राज्यभरातून ४ लाख१९ हजार ४०८ विद्यार्थी बसले होते.या परीक्षेत गणित व रसायनशास्त्रया विषयाच्या प्रश्नपत्रिकेबाबत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या हरकती लक्षात घेऊन ५ बोनस गुण सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत.पीसीबी गटातून १६ हजार ५४८ विद्यार्थ्यांना २००पैकी १०० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. मागील वर्षी १२ हजार ७१२ विद्यार्थ्यांना १०० पेक्षा अधिक गुण मिळाले होते. ५१ ते १०० या दरम्यान गुण मिळविणाºयांची संख्या सर्वाधिक ३ लाख २१ हजार ९९१ इतकी आहे. ५९ हजार विद्यार्थ्यांना ७७ पेक्षाही कमी गुण मिळाले आहेत.पीसीएम गटातून २२ हजार ८४४ विद्यार्थ्यांना २०० पैकी १०० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. मागील वर्षी ही संख्या २३ हजार ७८ इतकी होती. या गटातही ५१ ते १०० या दरम्यान गुण मिळविणाºयांची संख्या २ लाख १६ हजार ६२३ इतकी मोठी आहे. ५० पेक्षा कमी गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या ६२ हजार ९२२ इतकी आहे.निकालाचा टक्का घसरलायंदाच्या निकालाचा टक्का खालावल्याचे दिसून येत आहे. ज्या विद्यार्थी जेईई परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांना सीईटीचा पेपर सोपा गेला होता मात्र ज्या विद्यार्थ्यांनी फक्त सीईटीचा अभ्यास करून परीक्षा दिली त्यांना हा पेपर खूप अवघड गेल्याचे गुणांवरून दिसून येत आहे. राज्यातून केवळ १० ते १५ हजार विद्यार्थी जेईईची परीक्षा देतात. उर्वरित ४ लाख विद्यार्थी केवळ सीईटी देतात, असे प्रवेश परीक्षा मार्गदर्शकांनी सांगितले.
सीईटीमध्ये कदम, अभंग राज्यात प्रथम; १६ हजार विद्यार्थ्यांना १०० पेक्षा अधिक गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 2:42 AM