बारामती- पुरंदर तालुक्यामध्ये गुरुवारी (२६) मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा फटका बारामती तालुक्याला बसला. पुरंधर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे क-हा नदीला ५० वर्षात प्रथमच महापूर आला आहे. पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या अनेक कुटुंबांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. तसेच हजारो विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत. तालुक्यातील १५ हजार, बारामतीच्या ७ हजार ५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्याहालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.क-हा नदीकाठी असणा-या आंबी बु,आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली, माळवाडी, बाबुर्डी, जळगाव कडे पठार, जळगाव सुपे आदीगावांमधील नदीकाठच्या नागरीकांना हलविण्यात आले आहे. पुरंदरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री १.३० वाजता पाण्याचा मोठा विसर्ग नाझरे धरणातून सुरू करण्यात आला. तत्पूर्वी प्रशासनाने रिक्षातून भोंगा लावून पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील यांनी नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या. रात्रीपासूनच मोरगावच्या मुख्य चौकातून सुपेकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. नदीकाठची घरे पाण्याखाली गेली आहेत. अनेक नागरीकांनी स्वतः हून स्थलांतर केले. रात्री गराडे धरण, नाझरे धरण फुटल्याची पसरली होती.पन्नास वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात क-हा नदीला पूर आला नसल्याचे का-हाटी येथील शेतकरी वाल्मीकराव वाबळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. नदीकाठी असलेल्या गावांना पाऊस नाही. मात्र, पुराचा फटका बसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या पुराचा फटका कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक बंधा-यांचे कठडे तसेच संरक्षण भिंती तुटून पडल्या आहेत. बारामती तालुक्यातील आंबी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी ,माळवाडी, का-हाटी, फोंडवाडा ,जळगाव क.प., लोणकर वस्ती, जगताप वस्ती, क-हावागज, नेपतवळण, ब-हाणपूर, अंजनगाव येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.——————————————————...बारामती शहरात ‘हाय अॅलर्ट’बारामती शहरात प्रशासनाने नदीकाठच्या लोेकांना खबरदारीच्या सूचना देऊन रात्रीच सुरक्षित स्थळी हलविले आहे. नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूं, महत्त्वाची कागदपत्रे, किमती वस्तू सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. काल रात्रीपासूनच रिक्षाद्वारे पुकारून शहरातीलखंडोबानगर, वणवेमळा, पंचशीलनगर, म्हाडा कॉलनी, अनंत आशानगर, टकार कॉलनी या भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.——————————————————...क-हा नदीच्या पात्रात ८० हजार क्युसेक्स पाणी विसर्गक-हा नदीला महापूर येण्यापूर्वी पाटबंधारे खात्याने पात्रात ८० हजार क्युसेक्स पाणी विसर्ग केल्याचे संदेश प्रसारीत केले. त्यानंतर रात्रीचमहसूल, नगर परिषद प्रशासनाने शहरात सावधानतेचा इशारा दिला. तालुक्यातील १५ हजार, बारामती शहरातील ७ हजार ५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशासन सर्व पातळीवर सज्ज असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कऱ्हा नदीला ५० वर्षांत प्रथमच महापूर; नदीकाठच्या गावांमध्ये शिरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 8:48 AM