राहुल शिंदेपुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या इतिहासत प्रथमच अभियांत्रिकी विद्याशाखेच्या एका विद्यार्थ्याची पीएच.डी.ची व्हायवा(मौखिक परीक्षा) स्काईपद्वारे घेण्यात आली आहे.दिल्ली आयआयटीमधील प्राध्यापकांनी बाह्य परीक्षक म्हणून बुधवारी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची व्हायवा घेतली. पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा बाह्य परीक्षकांच्या उपस्थित घेतली जाते. मार्गदर्शकांसह संबंधित विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक उपस्थित असतात. बाह्य परीक्षकांने संबंधित प्रबंधाची गुणवत्ता तपासून तो पीएच.डी.साठी पात्र असल्यास विद्याथ्यार्ची मौखिक परीक्षा घेवून पीएच.डी.पदवी देण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. सिंहगड कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या मकरंद जाधव यांनी २०१३ मध्ये विद्यापीठाकडे पीएच.डी.साठी नोंदणी केली होती.त्यांनी पीएच.डी.चा प्रबंध सादर केला. विद्यापीठाने हा प्रबंध बाह्य परीक्षकांना तपासणीसाठी पाठविला होता. त्यांना आणखी संशोधन करण्यास सांगण्यात आले. जाधव यांनी या पुन्हा पाच महिने काम केले. त्यानंतर या संशोधनास पीएच.डी.देता येवू शकते,असा होकार परीक्षकांकडून मिळाला.त्यानंतर जाधव यांच्या मौखिक परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.आयआयटी दिल्लीतील प्राध्यापक रंजन बोस यांना पुण्यात येऊन पीएच.डी.ची मौखिक परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यांनी स्काईपद्वारे परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाला कळवले.विद्यापीठ प्रशासनासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी परवानगी दिली.आज परीक्षा घेण्यात आली. विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.अदित्य अभ्यंकर अध्यक्ष होते.तसेच कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे चे (सीओईपी) प्राध्यापक व विद्यार्थ्याचे मार्गदर्शक अशोक सपकाळ यावेळी उपस्थित होते.पीएच.डी.व्हायवासाठी विद्यापीठात येणा-या बाह्य परीक्षकांना प्रवास व निवासाचा खर्च द्यावा लागतो.विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ब-याच वेळा परदेशातील किंवा इतर राज्यांमधील प्राध्यापकांना बोलवावे लागते.तसेच त्यांना विमान प्रवासाचा खर्चही द्यावा लागतो.हा खर्च परवडण्यासारखा नसतो.त्यामुळे स्काईपद्वारे व्हायवा घेणे हा चांगला पर्याय बनू शकतो. ---------------जाधव यांचा पीएचडीच्या प्रबंधाचा विषयही तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. इंजिनिअरिंग अॅण्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये मोबाईल कम्युनिकेशनसाठी उपलब्ध असलेली थ्रीजी -फोरजीची ब्रॅडविडथ सेव्ह करता येते. त्यामुळे जास्त लोक नेटवर्कला कनेक्ट होतात आणि ब्रँडविडथची क्षमताही वाढते. हे तंत्रज्ञान फोरजी व फाईव्हजीसाठी वापरता येऊ शकते, यावरील शोधप्रबंध जाधव यांनी विद्यापीठाला सादर केला. ..................
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आॅनलाईन व्हायवा
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या परवानगीनंतर बुधवारी स्काईपद्वारे पीएच.डीची व्हायव्हा घेतली गेली.विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्याथ्यार्ची पीएच.डी.ची व्हायवा स्काईपद्वारे झाली.काही महिन्यांपूर्वी विज्ञान शाखेच्या विद्याथ्यार्ची व्हायवा अशा पध्दतीने घेण्यात आली होती.-डॉ.अदित्य अभ्यंकर,तंत्रज्ञान विभाग प्रमुख,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ