पुणे : बॅँक आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके गैरव्यवहारप्रकरणी अटक केली. राष्ट्रीयकृत बँकेच्या अध्यक्षांना अटक होण्याची ही देशातील गेल्या ४० वर्षातील पहिलीच घटना असल्याचे फॉरेन्सिक आॅडिटर शेखर सोनाळकर यांनी सांगितले़ यापूर्वी हरिदास मुंदडा गैरव्यवहार गाजला होता़ त्यावेळी जीवन विमा कंपनीच्या (एलआयसी) चेअरमनना राजीनामा द्यावा लागला होता़बँक आॅफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेचे नियम धाब्यावर बसवून ५० कोटी रुपये डीएसकेंच्या डीएसकेडीएल या कंपनीकडे वर्ग केले. तसेच कंपनीची परिस्थिती खराब असल्याचे माहीत असतानाही पुन्हा १० कोटींचे कर्ज देण्यात आले. तसेच ज्या कारणासाठी पैसे दिले त्याच कारणासाठी पैशाचा वापर झाला की नाही याबाबत चौकशी झालेली नाही. घाटपांडे यांनी लेखा परीक्षणात डीएसकेडीएल कंपनीची आर्थिक स्थिती मांडली मांडली असती तर ही वेळच आली नसती, असा युक्तीवाद अॅड. प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात केला. महाराष्ट्र बँकेकडून मार्च २०१६ मध्ये मिळालेले हे पैसे ड्रीम सिटी योजनेसाठी न वापरता कर्जरोख्यांची देणी फेडण्यासाठी वापरण्यात आले़कर्ज वाटप केले त्यावेळी डीएसके यांच्या कर्मचाºयांचे पगार थकीत होते़ डिसेंबर २०१६ मध्ये २५९ कर्मचारी कंपनी सोडून गेले होते़ जानेवारी २०१७ पासून ठेवीदारांचे व्याजाचे व मुद्दलाचे धनादेश न वटता परत जात होते़ ठेवीदारांचे व्याज व मुद्दलाचे धनादेश महाराष्ट्र बँकेतून जात होते़ मार्च २०१७ पर्यंत एकूण १२२० धनादेश बाऊन्स झाले होते़, अशीही माहिती समोर आली आहे.दरम्यान कोणतीही चौैकशी न करता गुप्ता आणि मराठे यांना अटक करण्यात आल्याचा युक्तावाद बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रीयकृत बँकेच्या अध्यक्षांना अटक होण्याची पहिलीच वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 5:08 AM