पुणे : महापालिकेचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. राजकीय वातावरण तापले आहे. मतदान करण्यासाठी नवमतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आपल्या अमूल्य मताबद्दल जागरूक झाल्याचे दिसून येते आहे. पहिल्यांदाच मतदान करीत असलो तरी आम्ही उत्साहाच्या भरात कोणालाही मतदान करणार नाहीत. आमचे मत विचार करूनच देणार, असा संकल्प पुण्यातील नवमतदारांनी केला आहे. त्यामुळे तरुणाईचे हे मत निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येत आहे.पुण्यात महापालिकेसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. महिन्यापासून सुरू असलेला प्रचार २० वारी थांबणार आहे. यावर्षी नवीन मतदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. या नवमतदारांच्या मतावरही निवडणुकीचे चित्र पालटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. मतदान तोंडावर आलेले असताना शहरातील नवमतदारांशी ज्या वेळेस संवाद साधला, यावेळी त्यांच्यामध्ये मतदान करण्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात असल्याचे जाणवले. मतदान केंद्रावर कशा प्रकारे प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात येते हे पाहण्याची मला खूप उत्सुकता वाटत आहे. मतदान करताना मला कसे वाटते ते मला अनुभवाचे आहे. - विवेक पाटीलया वर्षीपासून आम्ही मतदान करणार आहोत. आम्हाला आमच्या मताचे महत्त्व समजले आहे. आमच्या एका मताने निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. त्यामुळे आमच्या अमूल्य मताचे महत्त्व आम्ही जाणतो.- अनिकेत मदनेमी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. माझ्या आवडीच्या नेत्याल्याच मत देणार आहे. माझे मत अमूल्य आहे. माझे हे अमूल्य मत उत्कृष्ट लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी उपयोगी ठरेल. मी ज्याला मतदान करेल तोच उमेदवार विजयी होईल, यावर माझा विश्वास आहे. - यश मेहतामी माझे अमूल्य असे मतदान कधी होईल, याची मला खूप उत्सुकता होती. आता ती संधी आपली आहे. यावर्षी मला मतदानाचा हक्क बजावता येईल. निवडणूक प्रक्रियेत सामील होता येत असल्याने मला याचा खूप आनंद होत आहे. मतदान करून मी माझे कर्तव्य पार पाडणार आहे. - संदीप गाडेमतदानाचा हक्क बजावताना पूर्ण काळजी घेईल. माझे ज्या उमेदवारांची प्रतिमा माझ्या दृष्टीने स्वच्छ वाटते, त्यालाच मत देईन. स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडण्यात आमचाही सहभाग असणार यामुळे मला खूप उत्सुकता वाटते. आता मतदान करण्यासाठीची जी प्रतीक्षा आम्हाला लागली होती, ती आता संपली. - शुभम धनगरमला मतदान करण्याचा खूप उत्साह आहे. मला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळतोय, याचा मला अभिमान वाटतोय. परंतु आज आपल्या संपूर्ण देशात महिला व युवतींच्या छेडछाडींचे प्रकार वाढत आहेत. आता या छेडछाड करणाऱ्यांवर जो कोणी कारवाई करेल व आमच्या सुरक्षेची हमी देईल, त्यालाच माझे मत देईल. - सई चव्हाणया वेळी मला मतदान करण्याचा हक्क मिळाल्याने माझी उत्सुकता खूप वाढली आहे. परंतु उत्साहाच्या भरात आम्ही आमचे अमूल्य मत व्यर्थ न जाऊ देता जो नेता आमच्या परिसराचा विकास करेल, त्यालाच आम्ही मतदान करणार आहे.- काजोल बोडरेमतदानाचा हक्क तर आम्ही बजावणारच आहोत. मी पहिल्यास वेळेस मत करत असल्यामुळे मला खूप आनंद होतोय. तेथील मशीन कशी असतात, तसेच तेथील व्यवस्था कशा प्रकारची असते हे पाहण्याची मला खूप उत्सुकता वाटते.- अक्षदा धानवलेपूर्वी आई - वडिलांसोबत मतदान करायला आम्ही जात होतो. मात्र आता ही संधी प्रत्यक्षात मला मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी माझे मत जो उमेदवार युवतींच्या संरक्षणासंदर्भात जबाबदारी घेईल त्यालाच मी माझे मत देईल. - सोनाली नांदगावकरमी माझे अमूल्य मतदान हक्क बजावताना त्याच उमेदवाराला मत देणार जो आमचा परिसराचा विकास करेल. मला आमच्या मताचे हक्क बजवाण्याचा खूप आनंद होत आहे. माझ्या अमूल्य मताचे महत्त्व आम्ही जाणतो.- अपूर्वा पानसरेमला खूप दिवसांपासून मतदान करण्याची प्रतीक्षा लागली होती. ती आता येत्या मंगळवारी माझी प्रतीक्षा संपणार आहे. माझे मतदान करून माझा हक्क तर मी बजवणारच, शिवाय माझ्या मतामुळे एक लोकप्रतिनिधी निवडला जाणार असल्याने याचा मला खूप आनंद होत आहे. - अतुल सोनकांबळे
पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांचा उत्साह शिगेला
By admin | Published: February 19, 2017 4:56 AM