पुणे : मध्य रेल्वे जुलै महिन्यात राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत २ लाख ३२ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ९ कोटी ७२ लाख रुपयांचा दंड प्रवाशांकडून वसूल करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत फुकट्या प्रवाशांच्या संख्येत ७.४ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची शोधमोहीम राबविली जाते. मागील वर्षी जुलै महिन्यात २ लाख १६ हजार प्रवाशांना पकडण्यात आले होते. विनातिकीट प्रवास करणे, संपूर्ण प्रवासाचे तिकीट नसणे तसेच विनातिकीट माल नेणे अशा प्रवाशांचा त्यामध्ये समावेश आहे. यावर्षीच्या मोहिमेत २ लाख ३२ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यावर्षी त्यामध्ये ७.४ टक्क्यांची वाढ झाली असून उत्पन्नही ६.११ टक्क्यांनी वाढले आहे.एप्रिल ते जुलै या चार महिन्यात एकूण १३ लाख १७ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६९ कोटी ७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षी फुकट्या प्रवाशांची संख्या सुमारे १२ लाख एवढी होती. विनातिकीट प्रवाशांप्रमाणेच दुसºयांच्या आरक्षित तिकिटावर प्रवास करणाºया २०२ प्रवाशांवर जुलै महिन्यात कारवाई करण्यात आली. त्यांना १ लाख ८५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
फुकट्यांकडून पावणेदहा कोटी वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:18 PM