शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

माळीण पुनर्वसनात भिंतींना तडे

By admin | Published: June 26, 2017 3:43 AM

माळीण पुनर्वसनात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेल्याने रस्ते खचले, ड्रेनेजलाइन उखडल्या, गटारे छोटी झाल्याने पाणी वाहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : माळीण पुनर्वसनात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेल्याने रस्ते खचले, ड्रेनेजलाइन उखडल्या, गटारे छोटी झाल्याने पाणी वाहिले. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, ८-१० कुटुंबे पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहण्यास जाण्याची मागणी करू लागले आहेत. ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर डोंगर कोसळून ४४ कुटुंबांतील १५१ लोक मृत्युमुखी पडले. रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साचून डोंगराचा कडा कोसळला. यातून नशिबाने बचावलेल्या ग्रामस्थांचे नवीन माळीण वसून कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आले आहे. यातील ६७ घरांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व इतर मान्यवरांच्या हस्ते झाला. परंतु पहिल्याच पावसात या गावाची दयनीय अवस्था झाली आहे. दि. २४ रोजी झालेल्या संततधार पावसाने अनेक घरांचे भराव खचले, रस्त्यांना तडे गेले. भिंतींना तडे गेले, घरांच्या पायऱ्या खचल्या, ड्रेनेजच्या पाइपलाइन उखडल्या आहेत. गटारांचे चेंबर खचले आहेत. तसेच अंगणवाडीजवळील मोठी भिंत तुटल्याने शाळेला मोठा धोका निर्माण झाला आहे. शाळेमागील भराव वाहून आल्यामुळे व बाजूच्या भिंतीला तडे गेल्याने तेथे शाळा भरविता येणार नाही. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या आरसीसी भिंती घरांवर पडल्या तर गावावर मोठे संकट येऊ शकते. यासाठी काही लोक पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जायची मागणी करू लागले आहेत. सुमारे ८-१० कुटुंबांनी तेथून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ही परिस्थिती समजल्यानंतर तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार विजय केंगले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.