पुणे: वैयक्तिक वादाच्या कारणावरून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या पाच आरोपींना लोणीकंद पोलिसांनीअटक केली आहे. गणेश संजय चौधरी, वय २९, ओंकार अंकुश लांडगे, वय २५ वर्षे, दत्तात्रय भरत गाडे, वय २५ वर्ष, प्रताप अंकुश अडसूळ, वय २२ वर्ष, महेंद्र दत्तात्रय गाडे, वय २३ अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजित महादेव जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित महादेव जाधव आणि गणेश संजय चौधरी या दोघांमध्ये झालेल्या वैयक्तिक वादाच्या कारणावरून वाडेबोल्हाई येथे भांडणे झाली. त्यावेळी गणेश चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी हवेत गोळीबार केला. त्यानुसार गणेश संजय चौधरी व त्याचे इतर साथीदार मित्र याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने पोलीस पथकाने उरुळी कांचन, यवत, दौंड परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली ०१ चार चाकी, ०३ दुचाकी वाहने, हवेत गोळीबार करण्यासाठी वापरलेले ०१ अग्निशस्त्र, ०१ जिवंत काडतूस असा एकूण ५,९७,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी सर्जेराव कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, सहायक पोलीस निरीक्षक, रविंद्र गोडसे, पोलीस अमलदार अजित फरांदे, कैलास साळुंखे, स्वप्नील जाधव, सागर जगताप, अमोल ढोणे, शुभम चिनके, मल्हारी सपुरे, सुधीर शिवले, गणेश दळवी यांनी केली आहे.