लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : वरवे खुर्द येथील भंगार दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून व स्थानिक पोलिसांकडून जेरबंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन तलवार, एक गावठी पिस्तूल आणि ५ लाख ४३ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अनिकेत ऊर्फ दिनेश तानाजी काकडे (वय २२, रा. कांजळे), विकास अरुण थिटे (वय १९, रा. शिवरे), महेश विष्णू काळे (वय १९, रा. गोऱ्हे बु), झाकीर जमीर शेख (वय २२, रा. डोणजे) व एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. गेल्या १४ तारखेस भंगार व्यावसायिक कुर्बान इन्सान अली (वय २५, रा. वरवे खुर्द) यांनी शिंदेवाडी चौकीत फिर्याद दिली होती. वरवे येथे भारत पेट्रोल पंपाशेजारी रस्त्याच्या कडेला भंगाराचे दुकान असून, ते त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबासोबत राहत आहेत. रात्री २ वाजण्याच्या सुमारास सर्व जण झोपलेले असताना पत्र्याच्या रूमचा दरवाजा ठोठावला म्हणून कुर्बान याने कोण आहे, असा आवाज दिला असता, भंगार विकायचे आहे म्हणून दार उघडायला लावले होते. त्यावेळी घराबाहेर ७ ते ८ अनोळखी युवकांनी एकाने त्याच्या कानाखाली गावठी पिस्तूल लावून पैसे दे, नाहीतर उडवून टाकतो, असा दम देऊन रोख ३५ हजार आणि मोबाईल मिळून एकूण ५९ हजार रुपायांचा मुद्देमाल दरोडा टाकून फरार झाले होते.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने तपास करीत असताना गोपनीय बातमीदार आरोपी हे पुणे-सातारा हायवे रोडवरील हिंदवी कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे आरोपी मोटारीने येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शितफीने पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन तलवारी व एक गावठी पिस्तूल, तीन मोबाईल व गुह्यात वापरलेली कार असा ५ लाख ४३ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सोबत फोटो व ओळ : खेड शिवापूर पोलीस चौकीत पाच आरोपींसमवेत पोलीस अधिकारी आणि तपास पथक.
180921\img-20210917-wa0044.jpg
???? ???? ? ?? : ??? ??????? ????? ????? ??? ????? ????? ????? ??????? , ???????.