आयुर्मान संपलेल्या किंवा १२ लाख किमी पेक्षा जास्त धावलेल्या बस भंगारात काढल्या जातात. या बस विक्रीसाठी दि. २१ डिसेंबर पूर्वी घेण्यात येणाºया लिलावात अल्प बोली लावण्यात येत होती. पण दि. २१ डिसेबर रोजी घेण्यात आलेल्या लिलावासाठी सरकारमान्य अधिकाºयाची नेमणुक करण्यात आली. त्यामध्ये १९७ बस, २ टेम्पो आणि इतर सामान ठेवण्यात आले होते. आॅनलाईन व आॅफलाईन लिलावाची सुविधा उपलब्ध होती. यापुर्वी प्रति बसनिहाय स्क्रॅप लॉट तयार करण्यात येत होते. यावेळी तसे न करता बसच्या कंपनी प्रमाणे पाच बसचे समूह तयार करण्यात आले होते. यापूवी फक्त खात्याअंतर्गत असणारी स्क्रॅप कमिटी बसची किंमत ठरवत होती. यात मनपा, आरटीओ, राज्य परिवहन महामंडळातील अधिकाºयांचा समावेश असायचा. यावेळी स्क्रॅप बसची किमान किंमत ठरविण्यासाठी सरकार मान्य मुल्यमापन करणारºयाची नेमणूक करण्यात आली. दोन्ही किंमतीचा विचार करुन त्यानुसार किंमत ठरविण्यात आली.
या बदलामुळे सुमारे साडे पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत असल्याचे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
------