पुणे : घरातून चोरून कोकेन अमली पदार्थाची विक्री करणा-या नायजेरियन तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.
ओलमाईड किस्तोफर कायोदे (वय ४२, रा. वडाची वाडी, मूळ नायजेरिया) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ३० हजार रुपयांचे ५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.
उंड्री वडाचीवाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये नायजेरियन तरुण राहत असून तो चोरून कोेकेनची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अमलदार योगेश मोहिते यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून ओलमाईडला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५ लाख ३० हजार रुपये किमतीचे ५३ ग्रॅम कोकेन आढळून आले. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण शिर्के, सुजित वाडेकर, संदीप जाधव, राहुल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी यांच्या पथकाने केली.