घोडेगाव: आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात इतर ग्रामीण विकास कार्यक्रमांमधून पाच कोटी रुपयांच्या कामांना या आर्थिक वर्षात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे.
या निधीमधून नारोडी मुक्तादेवी हायस्कूल येथे सामाजिक सभागृह बांधणे, मंचर खाणवस्ती ते कौलीमळा रस्त्याची सुधारणा करणे, वळती सुंबरजाई औरंगपूर रस्ता नवीन करणे, निरगुडसर वळसेमळा ते दांगटवस्ती रस्ता करणे, नागापूर गडदेवस्ती ते कारमळा रांजणी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे, कळंब दत्तनगर ते ठाकरवाडी रस्त्याची सुधारणा करणे, महाळुंगे पडवळ घायाळवस्ती ते उदरमळा रस्त्याची सुधारणा करणे, पेठ खंडेराया देवस्थान या ठिकाणी शौचालय युनिट बांधणे, केंदूर कारेगाव रस्ता ते कंद्रुपवस्ती रस्ता करणे, पिंपरखेड बोंबेमळा ते चांडोह रस्त्याची सुधारणा करणे, पिंपरखेड पंचतळे ते भागडी रस्त्याची सुधारणा करणे, टाकळी हाजी येथे फाकटे ते जुना साबळेवाडी रस्ता करणे, चांडोह येथे भैरवनाथ मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, फाकटे गावांतर्गत चौक परिसरात कॉंक्रिटीकरण करणे, काठापूर खुर्द मुक्तादेवी मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे, म्हसे बु. येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे, निरगुडसर गावठाण अंतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयालगत शौचालयांचे बांधकाम करणे, पाबळ येथील चौधरीवस्ती ते आगरकर मळा रस्त्याची सुधारणा करणे, इजिमा १५२ ते घोलपवाडी रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करणे, रामा १०३ ते ढगेवाडी रस्ता अपूर्ण काम पूर्ण करणे, पिंपरगणे येथील सडकेचीवाडी ते वाघोबाचीवाडी रस्ता डांबरीकरण करणे, लांडेवाडी- पिंगळवाडी येथे पिंगळेवस्ती रस्ता करणे, रांजणी गावठाण स्मशानभूमी ते भैरवनाथ मंदिर मार्गे खिलारीमळा नागापूर शीव रस्ता डांबरीकरण करणे, थोरांदळे येथे श्री हनुमान मंदिर ते भैरवनाथ मंदिर प्रदक्षिणा मार्ग कॉंक्रिटीकरण करणे, अवसरी खुर्द शिंदेमळा अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे, गावडेवाडी डेरे आंबा ते पाचरखिळामळा व राणू गावडेमळा रस्ता डांबरीकरण करणे, टाकळी हाजी रस्ता ते खटाटेवस्ती रस्ता सुधारणा करणे, केंदूर ते कनेरसर रस्ता सुधारणा करणे, गणेगाव खालसा शिवरस्ता ते वरूडे शीव रस्ता सुधारणा करणे, वडगावपीर आदर्श विद्यालय ते गुळवेवस्ती रस्ता करणे, वडगावपीर दशक्रियाघाट परिसर सुधारणा करणे, जारकरवाडी येथे उपळी ते कॅनॉल रस्ता सुधारणा करणे, अवसरी खुर्द इंदोरेवाडी अंतर्गत रस्ता करणे, निरगुडसर येथे स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे, वळती भोकरवस्ती ते जाधवमळा रस्ता करणे या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.