पुणे : व्यंगचित्रांमधील आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मार्मिक रंजन करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी गुरुवारी ९६ वा वाढदिवस साजरा केला. प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कलेकडे निकोप दृष्टीने पाहण्याची गरज असून, त्यासाठी चित्रसाक्षरता महत्त्वाची आहे, यावर त्यांनी कायम भर दिला आहे. ‘आजवर केलेल्या कामाचे समाधान आहेच; मात्र यापुढेही काम करतच राहायचे आहे’, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
रंगरेषांचे जादूगार शि. द. फडणीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची ‘रेषाटन’ आणि ‘फडणीस गॅलरी’ ही दोन पुस्तके पुस्तक पेठतर्फे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘हसरी गॅलरी’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून शि. द. फडणीस यांची जादू आपण कायम पाहत आलो आहे. काळाबरोबर राहून वाचकांशी ‘आॅनलाईन’ भेटण्याच्या दृष्टीने ‘एस डी फडणीस गॅलरी’ हे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. गॅलरीमध्ये रंगीत, तसेच ब्लॅक अँड व्हाइट चित्रे, आजवर न पाहिलेली स्केचेस, काही फोटो, लेखन प्रदर्शित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
फोटो आेळी - ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे.
फोटो - एस डी फडणीस, एस डी फडणीस१, एस डी फडणीस२, एस डी फडणीस३, एस डी फडणीस४,