पुणे : ‘महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत तुम्ही राज्याची अर्थव्यवस्था कशी चालवणार,’ असा प्रश्न मी अर्थमंत्री झाल्यावर उपस्थित करण्यात आला. ‘मैैं पाच लाख का सौैदा करने आया हूँ औैर जेब में पाच फुटी कौैडी भी नही है’ या ‘त्रिशुल’ चित्रपटातील संवादाप्रमाणे आर्थिक चणचणीवर मात करून विकासाचे लक्ष्य गाठायचे आहे अशी ग्वाही मी दिली आहे,’ अशा शब्दांत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मार्मिक टिप्पणी केली.पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘भारतातील कोहिनूर हिरा इंग्रज घेऊन गेले, असे म्हटले जाते; मात्र निर्जीव हिºयापेक्षा चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या रूपाने मिळालेला ‘कोहिनूर’ जास्त मौैल्यवान आहे. संगीत, चित्रपटकलेचा समाजमनावर मोठा प्रभाव पाहायला मिळतो. चित्रपटांमधील संवाद आजही राजकारणात निवडणुका जिंकण्यासाठी वापरले जातात. पैैशांनी जे काम होत नाही, ते आनंदी आणि समाधानी मनाने होते. हा आनंद चित्रपटांमधून मिळतो. चित्रपटक्षेत्र हे रोजगार मिळविण्याचे मोठे माध्यम आहे. त्यामुळे चित्रपट उद्योगाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार कायमच प्रयत्नशील राहील.’- देशात जीएसटी लागू झाल्यावर, अनेक राज्यातील करमणूक कर वाढला; मात्र महाराष्ट्र या एकमेव राज्यात करमणूककरात वाढ झाली नाही, असे सांगत महाराष्ट्र चित्रपट क्षेत्राला कायम पाठिंबा देत आले आहे. भविष्यातही हा पाठिंबा देईल, अशी भावना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
पाच फुटी कौैडी नही, सौैदा पाच लाख का! मुनगंटीवारांची टिप्पणी, चणचणीवर मात करून विकासाचे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:38 AM