आमदार बेनके यांच्या निवास्थानी तमाशा परिषदेचे अध्यक्ष कलाभूषण रघुवीर खेडकर व उपाध्यक्ष अविष्कार मुळे, कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव, मोहित नारायणगावकर यांच्याकडे धनादेश सुपूर्त केला. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष सूरजभाऊ वाजगे हे उपस्थित होते.
आमदार बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव हे शहर तमाशा पंढरी म्हणून ओळखले जाते. गेल्या वर्षभरापासून तमाशा पंढरी असणाऱ्या आमच्या जुन्नर तालुक्यातील तमाशा लोककलावंतांना रोजगार उपलब्ध नाही. गावोगावच्या यात्रा बंद असल्याने तमाशा फडमालक, कलाकार यांच्यावर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीही काही प्रमाणात राज्य सरकारच्या वतीने दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. परंतु यंदाही ऐन यात्रा उत्सवांच्या काळातच लॉकडाऊन करण्यात आल्याने पुन्हा एकदा मोठं संकट या कलावंतांपुढे उभे राहिले आहे . कलावंत आणि फड मालक यांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या आणि माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या वतीने राज्यातील तमाशा कलावंतांसाठी ५ लाख रुपये मदत म्हणून देण्यात आले . पुढील काळातही फडमालक आणि तमाशा कलावंत यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासनही त्यांनी दिले.
०८ नारायणगाव
आर्थिक मदतीचा धनादेश रघुवीर खेडकर, अविष्कार मुळे, संभाजीराजे जाधव , मोहित नारायणगावकर यांच्या कडे सुपूर्त करताना अतुल बेनके.