कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गालगत सणसवाडी (ता. शिरूर) येथील भैरवनाथ मंदिरातील शनिमंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या राजाराम दगडे यांची दर्शन करतेवेळी स्विफ्ट कार व त्यामधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाइल असा सुमारे ८,७८,६०० रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी झाली. याबाबत शिक्रापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम दौलत दगडे (रा. बुकेगाव जांभळकरवस्ती ता. हवेली) हे त्यांच्या मालकीची स्विफ्ट कार (एमएच ४२ के ७२६५) मधून सणसवाडी येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराशेजारील शनि मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी त्यांनी त्यांची स्विफ्ट कार नगरच्या बाजुकडे दर्शनासाठी गेले होते. दगडे हे दर्शन करून परत आले असता त्यांना त्यांची कार जागेवर दिसली नाही. याबाबत राजाराम दौलत दगडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या स्विफ्ट कारमध्ये तीन लाख साठ हजार रुपये रोख रक्कम, एक लाख आठ हजार रुपये किमतीचे चार तोळे सोन्याचे गंठण, पंचवीस हजार चारशे रुपये किमतीचे दोन मोबाइल, बावीस हजार पाचशे रुपये किमतीची नटराज मिलन पंचधातूची मूर्ती तसेच त्यांचे पाकीट व त्यामध्ये अडीच हजार रुपये तसेच तीन लाख साठ हजार रुपये किमतीची स्विफ्ट कार असा ऐकून ८,७८,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याची फिर्याद दिली.(वार्ताहर)
कारसह पाच लाखांची चोरी
By admin | Published: May 01, 2017 2:06 AM