पुणे : दरोड्याच्या गुन्ह्यात कुख्यात गुंंड नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४२, रा शास्त्रीनगर, कोथरूड) याच्या आणखी पाच साथीदारांना गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने अटक केली. त्यांना २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांनी दिला आहे. अक्षय दिलीप गोगावले (वय २०), संदिप राम फाटक (वय २७), महेश बाळासाहेब आधवडे (वय २८, तिघेही रा. शास्त्रीनगर, कोथरूड), संतोष उर्फ दादू नागु कांबळे (वय ३०, रा. हनुमाननगर, दत्तवाडी) आणि स्वप्नील उर्फ मुन्ना सुखदेव रॉय (वय २६, जनता वसाहत) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. घायवळ टोळीचा प्रमुख नीलेश आणि त्याचा साथीदार सागर सोनबा जोगावडे (वय २९, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांना या पूर्वी अटक करण्यात आली असून त्यांनाही २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विकी सिबू रवानी (वय २२, रा. ढोले पाटील रस्ता, मूळ. झारखंड) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
कुख्यात गुंड घायवळच्या आणखी पाच साथीदारांना अटक; गुन्हे शाखेची पुण्यात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 7:19 PM
कुख्यात गुंंड नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४२, रा शास्त्रीनगर, कोथरूड) याच्या आणखी पाच साथीदारांना गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने अटक केली.
ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाची कारवाई २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांचा आदेश