पुणे ; पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये 5 ने वाढ झाली असून विभागातील एकुण रुग्ण संख्या 77 झाली आहे. त्यापैकी पुणे 36, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2,सांगली 25 आणि कोल्हापूर 2 अशी विभागणी आहे.
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतातही आता वेगाने प्रादुर्भाव होताना दिसत आहे. फक्त १२ तासात तब्बल २४० रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या १६३७वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी १३२ व्यक्ती पूर्ण बऱ्या झाल्या असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. आता या विषाणूच्या प्रादुर्भावातील तिसरा महत्वपूर्ण टप्पा सुरू झाला असून अधिकाधिक नागरिकांनी घरी राहावे म्हणून १४ एप्रिलपर्यंत देशभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याला प्रतिसाद मिळत असला काही नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. त्यांना मागील चार दिवसांपासून समजावून झाल्यावर आता पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान विभागातून आजपर्यंत तपासणीसाठी 1633 नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 1529 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 104 चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी 1413 नमुने निगेटीव्ह आहेत व 77 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 16 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे. विभागामधील 7795 प्रवाशापैकी 4276 प्रवाशांबाबत फ़ॉलोअप सुरू असून 3519 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे.