याबाबत राजगड पोलीस ठाण्याचे हवालदार निवास नाथाजी जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : भाटघर धरण भागातील भूतोंडे खोऱ्यातील वाकांबे गावचे ग्रामदैवत जानुबाईदेवीची
शुक्रवार, शनिवार यात्रा होती. यानिमित्ताने वाकांबे गावातील यात्रेचा जागर मंदिरात शुक्रवारी सुरू होता. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झालेले होते. याची माहिती राजगड पोलिसांना मिळाल्यावर हवालदार जगदाळे, एस. बी.भोसले, ई. एन. सूर्यवंशी
यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले तर गावात मोठा जनसमुदाय जमा झालेला होता. कोणीही तोंडाला मास्क लावलेला नव्हता. पोलिसांच्या गाडीची चाहूल लागताच गावातील जमावाने पळ काढला होता.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम यात्रा-जत्रा भरवण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गावपातळीवर तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्यामार्फत या आदेशाची माहिती सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत यांना देण्यात आली आहे, कोणीही कोरोना नियमांचे उल्लंघन करू नये. अन्यथा, कारवाई होणा र.
अजित पाटील तहसीलदार भोर