पुणे : आमच्याजवळचे होते नव्हते, ते पैसे या २२ दिवसांमध्ये संपून गेले आहेत. लॉकडाऊन संपल्यावर काम सुरु होईल, याआशेवर आम्ही कसेबसे तग धरुन होतो. पण आता लॉकडाऊन आणखी वाढल्याने जगायचे कसे हा आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. २१ दिवसांचा लॉकडाऊन आता संपेल, पुन्हा एकदा काम सुरु होईल, या आशेने ते पाच जण आला दिवस ढकलत होते. जेसीबीच्या मालकाने हातवर केले होते. इतके दिवस त्यांनी दम धरला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन आणखी वाढविला. ते ऐकल्यावर त्यांचा धीर सुटला. एक -एक दिवस मोठ्या मुश्किलीने काढणाऱ्यांना अजून १९ दिवस कसे काढायचे असा प्रश्न पडला. शेवटी त्यांनी घरी पंजाबात जाण्याचा निर्णय घेतला. कोथरुडमध्ये रहात असलेल्या खोलीतील सर्व कपडे एका बॅगेत भरले व ते दुपारी निघाले. थेट पंजाबला तेही पायी़ दिलशेरसिंग, सुखबिंदर सिंग, कमलजित सिंग, गुरुप्रित सिंग आणि इंग्रेजसिंग हे तरुण गेली ८ ते १० वर्षे पुण्यात जेसीबी, पोकलँड मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करीत आहेत. इतके दिवस त्यांचे काम चांगले चालले होते. लॉकडाऊन झाल्याने काम थांबले. याबाबत दिलशेरसिंग याने सांगितले की, रोज १० तासकाम करणारे आम्ही गेली २२ दिवस नुसते बसून आहोत. काम नसल्यान कंत्राटदाराने पैसे देण्यास नकार दिला़ आमच्याजवळचे होते नव्हते, ते पैसे या २२ दिवसांमध्ये संपून गेले आहेत. लॉकडाऊन संपल्यावर काम सुरु होईल, याआशेवर आम्ही कसेबसे तग धरुन होतो. पण आता लॉकडाऊन आणखी वाढल्याने जगायचे कसे हा आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे आम्ही पंजाबला जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: जवळ थोडे कपडे घेऊन आम्ही निघालो आहोत. येथून नगर व तेथून मनमाडपर्यंत पायी जाणार आहे. मनमाड येथे गुरुद्वारात थांबणार. तेथे पंजाबला जाणारे अनेक ट्रक येतात. त्यातून पंजाबला जाण्याचा आम्ही जाणार आहोत. पुण्याला परत येण्याचा काही विचार आहे का असे विचारता आता अगोदर घरी जाणे इतकेच आमच्या डोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले. आताते मनमाडपर्यंत २५० किमी पायी जाणार आहेत.
आता धीर संपला! लॉकडाऊन वाढल्याने ५ तरुणांनी पायी गाठायचं ठरवलं पंजाबातलं आपलं घर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 5:32 PM
२१ दिवसांचा लॉकडाऊन आता संपेल, पुन्हा एकदा काम सुरु होईल, या आशेने ते पाच जण आला दिवस ढकलत होते.,...
ठळक मुद्दे हे तरुण गेली ८ ते १० वर्षे पुण्यात जेसीबी, पोकलँड मशीनवर ऑपरेटर म्हणून करतात काम