पुणे : नामांकित हॉटेलवर कारवाईनंतर आता पंचतारांकित हॉटेलएफडीएच्या रडारवर आहेत. त्यांचीही अचानक पाहणी करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाºया शहरातील प्रसिद्ध हॉटेलची तपासणी करावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मुख्य कार्यालयाकडून विभागीय कार्यालयांना देण्यात आला आहेत. त्यानुसार जून महिन्यापासून पुण्यातील हॉटेलची तपासणी केली जात आहे.एफडीएच्या स्वच्छतेविषयीच्या मानकानुसार हॉटेलचालकांनी अन्न परवाना दर्शनी ठिकाणी लावणे, हॉटेलमधील कामगारांची आरोग्य तपासणी करणे, नियमितपणे पेस्ट कंट्रोल करणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे, भांडी धुण्याची जागा स्वच्छ ठेवणे, वेटरनी डोक्यात टोपी घालणे, शाकाहारी व मांसाहारींसाठी वेगळी व्यवस्था करणे, ओला व सुका कचरा टाकण्यासाठी दोन वेगळ्या पेट्या ठेवणे, अन्न तयार करण्याच्या जागेची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. मात्र, यातील अनेक गोष्टींची काळजी रूपाली व वैशाली हॉटेलने घेतलेली नसल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले होते. तर, या दोन हॉटेलपेक्षा अधिक प्रमाणात कॅफे गुडलकमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. परंतु, रूपाली, वैशाली हॉटेलचालकांनी सर्व त्रुटींची पूर्तता केल्याचा अहवाल एफडीएकडे सादर केला. तसेच, एफडीएकडून त्याची पुन्हा पाहणी करण्यात आली. एफडीएचे पुणे विभागीय सहआयुक्त सुरेश देशमुख म्हणाले, ‘‘एकाही नागरिकाला हॉटेलचे अन्न खाल्यामुळे विषबाधा होऊ नये, याबाबत एफडीए प्रयत्नशील आहे. त्यामुळेच शहरातील विविध ठिकाणी हॉटेलची तपासणी सुरू आहे.’’एफडीएच्या नियमावली व कायद्याबाबत स्टार वर्गातील हॉटेल व्यावसायिकांना एफडीएतर्फे नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले. दिवाळीनंतर आणि मुख्यत्वे ३१ डिसेंबरनिमित्त हॉटेलमध्ये होणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेलची तपासणी केली जाणार आहे.- सुरेश देशमुख, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग
पंचतारांकित हॉटेल एफडीएच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 3:03 AM