पिंपरी : हवामानात झालेला बदल यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सोलापूर येथील एका चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.शहरातील रुग्णालयात मृत्यू पावलेल्यांची संख्या पाचवर गेली आहे. संबंधित महिला १० मार्चला वायसीएममध्ये दाखल झाली होती. तिला १४ मार्चला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, आज तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरात स्वाइन फ्लूचे २९ रुग्ण आढळले असून, त्यांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. वातावरणातील बदल, कमी होत जाणारी रोगप्रतिकारक शक्ती, वाढणारा संसर्ग यामुळे महिनाभरात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे आठही रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या लस उपलब्ध आहे. ४९ दवाखान्यांमध्ये स्क्रीनिंग सेंटर आहेत. एकूण ९ अतिदक्षता विभाग आरक्षित आहेत. जिथून स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळताच महापालिका रुग्णालयांना त्वरित कळविणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘स्वाइन फ्लू’ने घेतला शहरात पाचवा बळी
By admin | Published: March 18, 2017 4:46 AM