शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

काळजाचा ठोका चुकवणारी घटना..! पाच वर्षांच्या मुलाने चालू केलेली कार रेल्वेला धडकली 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 4:52 PM

काळजाचा ठोका चुकवणारी घटना..बंद असलेल्या रेल्वे फाटकाजवळ कार थांबवून चालक उतरल्यावर त्याच्या पाच वर्षांच्या मुलाने ड्रायव्हिंग सीटवर येऊन कारची चावी फिरवली..

यवत : खामगाव फाटा (ता. दौंड) येथे बंद असलेल्या रेल्वे फाटकाजवळ कार थांबवून चालक उतरल्यावर त्याच्या पाच वर्षांच्या मुलाने ड्रायव्हिंग सीटवर येऊन कारची चावी फिरवली. त्यामुळे चालू झालेली कार थेट रेल्वे फाटक तोडून समोरच्या मालगाडीला धडकली. त्याचदरम्यान सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस काही तेथे पोचणार होती. मात्र, गेटमन बाळासाहेब पाटील यांनी प्रसंगावधान दाखवून हुतात्मा एक्स्प्रेसला रेड सिग्नल दिला आणि हुतात्मा एक्स्प्रेसचे गेटजवळ येताच ब्रेक लागले आणि मोठा अनर्थ टळला. ही घटना आज (बुधवारी) सकाळच्या सुमारास घडली. पुणे ते दौंड रेल्वेमार्ग दरम्यान खामगाव येथे रेल्वे गेट आहे. सदर गेट मालगाडी आल्याने बंद करण्यात आले होते. रेल्वे गेटमन बाळासाहेब पाटील यांनी पुण्याकडून सोलापूर बाजूकडे मालगाडी जाणार असल्याने रेल्वे गेट बंद केले होते. यावेळी खामगावकडे जाणारी कार (एम.एच. १२, एफ.यू. ४०००) ही बंद फाटकाजवळ येऊन थांबली. कारचालक किशोर माने गाडी बंद करून खाली उतरले होते. या वेळी त्यांच्या पाच वर्षांच्या लहान मुलाने ड्रायव्हिंग सीटवर येऊन कार चालू केली. त्यामुळे कारने रेल्वे गेटला धडक देत मालगाडीला अनेक वेळ धडक दिली. ...........अपघात झाले तेंव्हा कारमध्ये लहान मुलासह तीन महिला गाडीत होत्या. याचवेळी दुसºया बाजूने सोलापूर- पुणे बाजूकडे हुतात्मा एक्स्प्रेस जाणार होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गेटमन बाळासाहेब पाटील यांनी रेल्वे गेटवरील आपत्कालीन यंत्रणेचा वापर केला. अपत्कालीन यंत्रणेचा वापर केल्याने  हुतात्मा एक्स्प्रेस पुणे बाजूकडे जाण्यास सिग्नल नसल्याने गेटजवळ येऊन थांबली. घटनेची माहिती मिळताच पुणे रेल्वे डिव्हिजनचे अधिकारी  सहर्ष बाजपेई, शैलेन्द्रकुमार सिंग, पी. बी. सिंग यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पी. बी. सिंग करत आहेत.   

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेAccidentअपघातcarकार