पुणे : जगभरातील १५० देशांचे ध्वज पाहून त्या देशांची नावे व राजधानी केवळ ४ मिनिट १७ सेकंदामध्ये सांगणा-या पाच वर्षाच्या प्रेशा खेमानी या मुलीच्या अनोख्या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकोर्ड इंडियामध्ये झाली आहे. प्रेशा ही मुळची मध्यप्रदेशातील उज्जेन येथील असून सध्या पुण्यातील संस्कृती शाळेत शिक्षण घेत आहे.
प्रेक्षाचे वडील चार्टर्ड अकाऊंटंट असून आई गृहिणी आहे. प्रेशाला एखादी गोष्ट सांगितली तर ती विसरत नसल्याचे तिच्या आईला जाणवले. काही देशाचे ध्वज, त्यांची नावे आणि राजधानी हे तिच्या बरेच दिवस लक्षात राहत असल्याचे निर्दशनास आले. एकूणच तिची स्मरणशक्ती अफाट असल्याचे दिसून आल्याने तिच्या आईने काही दिवस एका पुस्तकातील देशांची नावे व राजधानी याबाबत प्रेशाचा अभ्यास घेतला. त्यानंतर वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये याबाबत नोंदणीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नुकतेच तिला हा विक्रम केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
प्रेशाला नृत्य, सायकलिंग आणि कुकिंगची आवड असून पाच वर्षाच्या वयात ती केक तयार करू शकते. दीड वर्षाची असतानाच तीने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाच मॅडेल प्राप्त केले होते.