पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
देशाच्या उज्ज्वल वाटचालीत सहकार क्षेत्राचे अतुलनीय योगदान असून, सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे अनास्कर या वेळी म्हणाले. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करून, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करू या, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
फोटो मेल केला आहे.