या देऊळगावगाडा ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्र.४ मध्ये लक्षवेधी लढत ठरली ती भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी उपसभापती नामदेव बारवकर यांच्या विरोधात विशाल बारवकर यांची. यामध्ये विशाल बारवकर यांनी नामदेव बारवकर यांचा तब्बल ६९ मतांंनी पराभव केला आहे.
प्रभाग क्र. १ मधील विजयी उमेदवार व मिळालेली मते संतोष मोरे (२४६), गणेश जाधव (३१४), कल्पना शितोळे (३४५) प्रभाग क्र २ मधील विजयी उमेदवार व मिळालेली मते: राजवर्धन जगताप (१२२), लता रासकर (१२५) प्रभाग क्र. ३ मधील विजयी उमेदवार व मिळालेली मते अक्षय बारवकर (२८१), वैशाली बारवकर (२८१), प्रमिला वाघापुरे (२८६) प्रभाग क्र. ४ मधील विजयी उमेदवार व मिळालेली मते: विशाल बारवकर (२९८), विजया बारवकर (२७८), श्रद्धा गवळी (२७४) देऊळगावगाड़ा ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात येण्यासाठी रामदास डेंबळकर, जालिन्दर बारवकर, हिरामण पिंगळे, नीलेश बारवकर, आदेश जाचक, भाऊसो शितोळे यांनी प्रयत्न केले आहेत.
देऊळगावगाडा (ता.दौंड) येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा पक्षाचा झेंडा फडकला गेला आहे.