शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
5
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
6
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
7
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
8
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
9
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
10
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
11
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
12
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
13
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
14
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
15
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
16
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
17
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
18
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
19
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
20
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 

वानवडीत रस्त्यांवरील ‘फ्लेक्स’ धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 2:15 AM

महानगरपालिका व छावणी बोर्ड : हद्दीचा वाद, फ्लेक्स वेळेवर लावले जातात; परंतु काढले जात नाहीत.

वानवडी : परिसरात शुभेच्छा, कार्यक्रम, व्यावसायिक जाहिराती यांचे फ्लेक्स लावण्यात आले असून, ते आता धोकादायक स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे फ्लेक्स लावले जातात, पण ते काढणार कोण, हा प्रश्नच निर्माण झालेला आहे. कँटोन्मेंट हद्दीतील फातिमानगर चौकात वळणाच्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला व्यावसायिक, राजकीय नेते व कार्यकर्ते यांच्याकडून कार्यक्रम, शुभेच्छा व जाहिरातींचे फ्लेक्सलावले आहेत. परंतु, हे फ्लेक्स तुटल्याने पडण्याच्या स्थितीमध्ये आहेत, त्यामुळे वाहकांना व पायी चालणाऱ्या नागरिकांना याचाधोका असून, ते फ्लेक्स अंगावर पडून अपघात होण्याची शक्यता आहे.

वानवडी परिसरात रस्त्याच्या कडेला, रस्त्यावरील विद्युत दिव्यांच्या खांबांवर, महावितरणच्या विद्युत वाहक डीपींवर, तसेच रस्त्यावरील मोठ मोठ्या झाडांवर असुरक्षितरीत्या व्यावसायिकांचे, राजकीय नेत्यांचे तसेच शुभेच्छा देणाºया कार्यकर्त्यांचे फ्लेक्स कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना लागले असून, ते धोकादायक आहेत. जाहिरात करण्यासाठी होर्डिंग असूनसुद्धा परिसरात व सार्वजनिक ठिकाणी परवानगी नसतानादेखील लाकडाच्या, तसेच लोखंडी चौकटीवर छापलेले फ्लेक्स चिकटवून रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी जागा मिळेल तिथे लावले जातात. परंतु, ते वेळच्या वेळी काढले जात नसून ते त्या जागीच खराब होऊन पडून जातात.नुकत्याच होर्डिंग पडलेल्या घटनेचा अनुभव असतानादेखील अशा प्रकारचे छोटे-मोठे फ्लेक्स पडूनसुद्धा मोठा अपघात होऊ शकतो. तरी देखील या समस्येकडे दर्लक्ष होते आहे.वेळेत लावले जातात; पण काढणार कोण..?४एखादा कार्यक्रम किंवा सण, शुभेच्छा देण्याच्या वेळी; तसेच व्यावसायिक जाहिरात करण्यासाठी फ्लेक्स मोठ्या आवडीने एका रात्रीत लावतात; परंतु तोच कार्यक्रम, सण झाल्यानंतर हे फ्लेक्स लावणाºयांकडून लगेच काढले जात नाहीत, त्यामुळे ते नक्की कोण काढणार, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे कँटोन्मेंट व महापालिकेकडून याबाबतीत कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.४महापालिका प्रशासनाच्या आकाशचिन्ह किंवा अतिक्रमण विभागाकडून धोकादायक ठिकाणी लावण्यात येणाºया अनधिकृत विनापरवाना छोट्या-मोठ्या फ्लेक्स लावणाºयांवर कारवाई करून दंड वसूल केला पाहिजे, जेणेकरून महापालिकेचा महसूल वाढण्यास मदत होईल व फ्लेक्स लावणाºयांवर वचक बसेल.परवानगी नसताना विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या व धोकादायक स्थितीत फ्लेक्स लावणाºयांवर कारवाई करण्यात येईल; तसेच अनधिकृत धोकादायक फ्लेक्स काढण्यात येतील.- मुरलीधर लोणकर,परवाना निरीक्षक,आकाशचिन्ह विभाग

टॅग्स :Puneपुणे