पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १३५ कोटी रुपये इतका खर्च येणार असून, त्याला महापालिका स्थायी समिती सभेमध्ये मान्यता देण्यात आली.भक्ती-शक्ती चौक, निगडी ते दापोडी हा रस्ता महापालिकेतर्फे विकसित करण्यात आला आहे. या मार्गावर सार्वजनिक बीआरटीएस बस वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे. परंतु, या ठिकाणी असलेल्या चौकामुळे लहान-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे आणि वाहतुकीची कोंडीही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी या चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याचा महापालिकेचा मानस असून, त्याला नगरसेवक आणि आयुक्तांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.भक्ती-शक्ती चौक येथे ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल उभारण्यासाठी सुमारे १३५ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यास पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थायी समिती सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. पुणे-मुंबई महामार्गावर पादचारी पूल बांधणे व अनुषंगिक स्थापत्यविषयक कामाला २० एप्रिल २०१६ च्या महासभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामात ‘पादचारी पूल बांधणे ऐवजी सब-वे बांधणे’ असा बदल करण्यात आला असून, त्यालाही सभेत मान्यता देण्यात आली आहे. दोन कोटी खर्च : बेघर, निराश्रितांसाठी रात्र निवारा केंद्र
१३५ कोटींचा उड्डाण पूल
By admin | Published: October 05, 2016 1:00 AM