परिवहन विभागाकडून आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवले जातात. या क्रमांकांसाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क भरून ग्राहकांना संबंधित नोंदणी क्रमांक देण्यात येतो. एकाच क्रमांकासाठी अधिक अर्ज असल्यास लिलाव पध्दतीने हा क्रमांक दिला जातो. त्यामध्ये ग्राहकांकडून शुल्कापेक्षा जास्त पैसे मोजून क्रमांक घेतला जातो. अनेक जण हवा तो क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. त्यातून प्रादेशिक परिवहन विभागाला दरवर्षी मोठा महसुल मिळतो. पुण्यात २०१९ मध्ये २३ हजार ९७० जणांनी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अतिरिक्त पैसे मोजले आहेत. तर २०२० मध्ये हा आकडा ६ हजार ९१९ एवढा आहे. मागील वर्षी प्रत्येकी साडे चार लाख शुल्क भरून ८ जणांनी तर चार लाख भरून ४ जणांनी ०००१ हा क्रमांक घेतला आहे. यंदा हे प्रमाण अनुक्रमे २ व ३ एवढे आहे. साधारणपणे २० ते २५ हजारांहून कमी शुल्क असलेल्या क्रमांकासाठी अधिक मागणी आहे.
यंदा लॉकडाऊनमुळे सुरूवातीचे तीन महिने वाहन नोंदणी ठप्प होती. पण नोंदणी सुरू झाल्यानंतर पाच महिन्यांतच या क्रमांकातून परिवहन विभागाला ७ कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यामध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचाही समावेश आहे. यामध्ये ०७८६,०१००,९९९९,१०००,१२१२,९०९०,२१२१,४१४१ आदी क्रमांकांना अधिक पसंती असते. तसेच नागरिकांकडून जन्म, विवाह तारखांची बेरीज, मिरर इमेज तसेच काही विशेष दिवसांच्या तारखांनुसारही नोंदणी क्रमांक घेतले जातात.
--
आकर्षक नोंदणी क्रमांकातून मिळालेले उत्पन्न
२०१९-२० - २२ कोटी ४१ लाख ३० हजार १३९
२०२०-२१ (नोव्हेंबरपर्यंत) - ७ कोटी १४ लाख ४९ हजार ३२८
--
आकर्षक नोंंदणी क्रमांकासाठी शुल्कवाढ प्रस्तावित आहे. नागरिकांनी त्यांची मते व सुचना दिलेल्या मुदतीत परिवहन विभागाला कळवावीत. त्या सुचना, हरकतींचा विचार शुल्कवाढीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
-संजय ससाणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
(डमीची बातमी आहे)