पुणे : पुणे शहरातील ओढे आणि पुरंदर, बारामतीमधून वाहणाऱ्या कऱ्हा नदीने रौद्र रुप धारण केल्याने उडालेल्या हाहाकारात १५ जणांचा बळी गेला. ८ जण वाहून गेल्याने बेपत्ता आहेत. ९००च्यावर जनावरेही मृत्युमुखी पडली असून हजारो वाहनांचे नुकसान झाले आहे. झोपडपट्ट्यांबरोबरच आलिशान सोसायट्या आणि बंगल्यांमध्येही पुराचे पाणी घुसल्याने नागरिक भयभित झाले होते. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. कात्रज तलाव साखळीतील तीनही तलावांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला. कात्रजपासून ते जनता वसाहतपर्यंतच्या संपूर्ण परिसरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढले. सुमारे आठ ते दहा फूट पाणी वाहत होते. यामध्ये ओढ्यासह अनेक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळल्याने शेकडो वाहने वाहून गेले. पुणे शहरासह जिल्ह्यातील ५ तालुक्यांना बुधवारी रात्री धुवाँधार पावसाचा फटका बसला.
..............अरण्येश्वर येथील टांगा कॉलनीतील घराची भिंत पडून सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जान्हवी सदावर (वय ३२) त्यांचा मुलगा मुलगा श्रीतेज (वय ९), रोहित आमले (वय १५) वस्तीतील लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे संतोष कदम (वय ५५) हे रिक्षाचालक यांचा समावेश आहे. याच वस्तीतील लक्ष्मीबाई पवार (वय ७०) आणि ज्योस्ना राणे (वय ३०) या दोघी पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेल्या...........खेडशिवापूरमध्ये पावसाने चौघांचे प्राण गेले. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरती श्याम सूर्यवंशी (वय ३५), शाम रामलाल सूर्यवंशी (वय ४०) आणि त्यांची मुलगी गौरी (वय १४) यांचा मृत्यू झाला. साईनाथ सोपान भालेराव (वय ३५) यांचा मृत्यू झाला. फकीर राजू (वय ४०) आणि एका तृतीयपंथीयाचाही मृतदेह सापडला आहे. मुसळधार पावसामुळे ससेवाडी, गोगलवाडी, शिंदेवाडी, वेळू, कासुर्डी या भागातील ओढ्याचे पाणी खेडशिवापुर जवळ एकत्र आले. ........सिंहगड रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरात मोटार वाहून जाऊन किशोर दत्तात्रय गिरमे (वय ५४) यांचा मृत्यू झाला. मच्छिंद्र पांडुरंग बवले (वय ४२) यांचाही बुडून मृत्यू झाला. अमृता आनंद सुदामे (वय ३७) या परिचारिका दुचाकीवरून जात असताना वाहनू गेल्या. सनसिटीजवळील मैदानावर त्यांचा मृतदेह सापडला. ..........वानवडी परिसरात वाहणाºया भैरोबा नाल्याला आलेल्या पुरात मोटारीतून जाणारे दोघे जण वाहून गेले. व्हिक्टर सांगळे (वय २६) आणि सलीम शेख अशी त्यांची नावे आहेत. कात्रज परिसरात मोटार वाहून गेल्याने त्यातील तीन जण बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी एका महिला आणि मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात नागराज बाळकृष्ण भिल (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला. सुमन अजिनाथ शिंदे (वय ६५) यांचाही मृत्यू झाला. ........पुरंदर तालुक्यात भिवडीतील ओढ्याला आलेल्या पुरामुळे भिवडी येथे गजराबाई सुदाम खोमणे (वय ७५) आणि छकुली अनंता खोमने (वय २१) या दोघी वाहून गेल्या. भिवडी येथील ओढ्यालागत खोमणे कुटुंबीय राहत होते. अचानकपने पाण्याचा लोंढा आल्याने संपूर्ण घराला पाण्याने वेढा घातला होता. ........