वालचदंनगर : नीरा नदीमध्ये वीर भाटघर आणि नीरा देवधर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या नीरा नदीमध्ये २३ हजार क्युसेकने विसर्ग केला आहे. पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या तावशी, उद्धट, जांब, कुरवली, चिखली, कळंब, निमसाखर,निरवांगी,खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी चाकाटी सराटी ते नृसिंहपूर गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिला आहे. इंदापूर तालुक्यात सध्या समाधानकारक पाऊस नसला तरी नीरा नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे, अनेक शेतकऱ्यांनी नीरा नदीमध्ये पाणी सोडण्याची बातमी ऐकताच नदीपात्रातील विद्युतपंप पाईप, केबल्स काढून घरी आणल्याचे दिसत आहे.
: वीर, भाटघर, आणि नीरा देवधर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग केल्यामुळे नीरा नदीला महापूर आलेला आहे.
१४०९२०२१-बारामती-११
————————————————