पुणे : पुणे महापालिकेमधील अतिरिक्त आयुक्त पदाच्या दोन जागा रिक्त आहे. त्यामुळे एकाच अतिरिक्त आयुक्तावर प्रशासकीय कारभाराचा ताण आला आहे. त्यातच पुणे महापालिकेमध्ये रिक्त असलेल्या पदावर राज्यसरकारकडुन चार उपायुक्त आले आहेत. पण या उपायुक्ताची नियुक्ती होउन सात दिवसाचा कालावधी झाला आहे. पालिकेतील क्रिम खाते मिळावे यासाठी हे उपायुक्त लॉबिंग करत आहेत. त्यामुळे या पण या चार उपायुक्तांच्या कामाचा विभाग अदयापही ठरलेला नाही. पुणे महापालिकेचे तत्कॉलीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, रविंद्र बिनवडे यांची बदली झाली. त्यामुळे अतिरक्त आयुक्त पदाच्या दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. पुणे महापालिकेत उपायुक्त पदाच्या एकुण १८ जागा आहेत. त्यातील ९ उपायुक्त पालिकेतुन आणि ९ उपायुक्ताची पदे राज्यसरकारकडुन प्रतिनियुक्तीने भरली जातात. त्यातील राज्यसरकारकडील उपायुक्तपदाची पाच पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकाच विभागच्या उपायुक्ताकडे अन्य दाेन ते तीन विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यातच राज्यसरकारने आशा राउत, चेतना केरूरे यांची १९ जुलै रोजी तर सुनिल बल्लाळ, प्रशांत ठोंबरे यांची २४ जुलै रोजी नियुक्ती करण्याचे आदेश राज्यसरकारने काढले आहेत. त्यामुळे पालिकेला चार उपायुक्त मिळाले आहेत. मात्र पालिकेतील क्रिम खात्यासाठी या चार उपायुक्त लांबिग करत आहेत. त्यासाठी पालिकेतील अतिवरिष्ठ अधिका०यावर वेगवेगळया मार्गाने दबाव आणला जात आहे. त्यामुळे नियुक्ती होउनही या चार उपायुक्तांचा कामाचा विभाग ठरलेला नाही.
संजय शिंदेची बदली केली पण अन्य ठिकाणी नियुक्ती नाही
खडकवासला धरणातुन पाणी सोडल्यानंतर शहरात नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) येथील एकतानगर परिसरात पूर आल्यानंतर निर्माण झालेली स्थिती आणि अस्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी उपायुक्त संजय शिंदे यांची बदली करण्यात आली. पण त्यांनाही अदयाप कामाचा विभाग ठरलेला नाही.
पुर स्थिती असताना अधिकारी बसुन शहरात खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर एकता नगर, संगमवाडी, येरवडा, बाणेर , बालेवाडी या भागात पाणी शिरले. त्यामुळे संबंधित भागातील उपायुक्तावर कामाचा ताण पडला होता. मात्र या स्थितीतही राज्यसरकारकडुन आलेले चार उपायुक्त दर्जाचे अधिकारी बसुन होते.