पुण्यात रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे शहराच्या अनेक भागांत पाणी साचले आहे. सिंहगड रोडवरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. याशिवाय पुण्यातील डेक्कन परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे अनेक लोक पाण्यात अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेस विसर्ग सुरू असल्याने पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच, आज सरकारच्या चुकीमुळे सामान्य नागरिकांची जी अडचन निर्माण झाली आहे, यात आमचे सहकारी, पदाधिकारी सरकार आणि पुणेकरांच्या मदतीसाठी संपूर्ण तागदीनिशी उतरले आहे. तसेच प्रशासनाला जी काही मदत करावी लागेल, ती आम्ही करणार आहोत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्या पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आता पुरते राजकारण बाजूला ठेवू, आज सरकारच्या चुकीमुळे सामान्य नागरिकांची जी अडचन झाली आहे, यात आमचे सहकारी, पदाधिकारी सरकार आणि पुणेकरांच्या मदतीसाठी संपूर्ण तागदीनिशी उतरले आहेत. मी काही सहकाऱ्यासोबत सकाळपासून संपर्कात आहे. प्रत्येक जण उतरून दूध असेल, पाणी असेल, तसेच अडचणीत आलेले लोक, मग ज्येष्ट नागरीक असतील, कुणाची औषधी असेल, अशी जी काही मदत आम्हाला करता येईल किंवा लोकांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने प्रशासनाला जी काही मदत करावी लागेल, ती करणार आहोत.
पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थिती संदर्भात बोलताना सुळे म्हणाल्या, "खरे तर आता आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ नाही. पण मला दोन गोष्टी प्रशासनाला निश्चितपणे विचारायला आवडतील. जर एवढा पाऊस होता, अलर्ट होता तर, तुम्ही तो अलर्ट नागरिकांपर्यंत का नाही पोहोचवला? हा पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे, जेव्हा तुम्ही पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भोंगा असेल अनाउंसमेंट असेल, आता तंत्रज्ञान एवढे झाले आहे की व्हॉट्स अॅप असेल, मोबाईल असेल, मग प्रशानाने लोकांना का नाही कळवलं? जर प्रशासनाने पाणी सोडण्यापूर्वी अर्धा-एक तास वेळ दिला असता, तर यातले ज्येष्ठ नागरीक आणि लहान मुलांना आपण कुठे तरी स्थलांतर केले असते. पण प्रशानसनाचे लक्षच नाही. तसेच, पावसाचे मॅनेजमेंट करायला पुण्याचे स्थानिक प्रशासन कमी पडले आहे."
पुण्याला पावसाचा वेढा: लोक अडकले, झाडे कोसळली, भीषणता दाखवणारे 12 PHOTOS
यावेळी, सुप्रिया सुळे यांनी लोकांनाही फार महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे, तसेच वाहने हलवण्यासाठी आपण वाहनांत बसत असाल तर वाहने लॉकन करण्याचे आणि खिडक्या न लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सिंहगड रोडवर काही लोकांना वाहनांच्या काचा फोडून बाहेर कढण्यात आले आहे.ऑटोमॅटिकली नाहने लॉक होत आहेत, असेही सुळे म्हणाल्या.