पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात गुढीपाडव्याच्या सणामुळे शेतमालाची आवक घटली. मागणीच्या तुलनेत शेतीमालाची आवक कमी झाल्याने आले, लसूण, फ्लॉवर, कोबी, मटार, पावटा या भाज्यांच्या दरात वाढ झाली, तर आवक वाढल्याने दोडका, काकडी, कारली यांचे भाव घटले. इतर सर्व फळभाज्यांचे दर स्थिर राहिल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी सुमारे १३० ते १४० ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यातून कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ते ४ ट्रक कोबी, बेंगलोर येथून ३ टेम्पो आले, पंजाब व सिमलामधून ३ ते ४ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ८ ट्रक गाजर, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ३ ते ४ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात मधून लसणाची ४ हजार गोणी इतकी आवक झाली.त्याचप्रमाणे स्थानिक भागातून सातारी आल्याची ७०० ते ८०० पोती, टॉमेटो ४.५ ते ५ हजार पेटी, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, पावटा ५ ते ६ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गवार २ टेम्पो, मटार ४०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, चिंच ४० ते ५० पोती, तर कांद्याची १०० ट्रक आणि आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून ४० ट्रक इतकी नवीन बटाट्याची आवक झाली.>झेंडू, गुलछडी,मोगरा महागलापुणे : मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा सण आणि सोमवारी श्री स्वामी समर्थ यांची जयंती आल्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात जिल्ह्यातून विविध फुलांची मोठी आवक झाली. रविवारच्या तुलनेत शनिवारी फुलबाजारात फुलांची आवक दुप्पट होती. फुलांची आवक जास्त असूनही फुलांना मागणी असल्याने बहुतेक फुलांचे दर ५० टक्क्यांनी वाढले. आवक जास्त झालेली असताना व्यापरी व ग्राहकांकडून फुलांना मागणी होती. त्यामुळे फुलांना चांगला दर मिळाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत झेंडू, गुलछडी, बिजली, मोगरा, लिली आदी फुलांच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली. शोभिवंत फुलांचे दर स्थिर राहिले, असे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.>लिंबू, संत्री, मोसंबीचे दर वाढलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून हवामानात चढ-उतार होत आहे; मात्र मार्च महिन्याचा तिसरा आठवडा उजाडल्याने उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी ग्राहकांकडून रसाळ फळांना पसंती असते. त्यामुळे गुलटेकडी येथील फळबाजारात कलिंगड, खरबूज, मोसंबी, संत्री आदी थंडावा देणाऱ्या फळांना मोठी मागणी आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने मोसंबी, संत्रीच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.रविवारी गुलटेकडी येथील फळबाजारात अननस ६ ट्रक, मोसंबी ४० टन, संत्री ४० टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई १० ते १२ टेम्पोे, लिंबाची ३.५ ते ४ हजार गोणी, चिक्कू २ हजार डाग, पेरू २०० क्रेट, कलिंगड ३० ते ३५ टेम्पो, खरबूज १५ ते २० टेम्पो, सफरचंद १ ते १५०० हजार पेटी, द्राक्षे २० ते २५ टन, आंब्याची ५०० ते ६०० पेटी इतकी आवक झाली. फळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : २५०-९००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : २००-३५०, (४ डझन ) : १३०-२२०, संत्रा : ( ३ डझन) १५०-४००, (४ डझन) : ६०-१८०, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१४०, गणेश १०-३०, आरक्ता २०-६०. कलिंगड : ०५-१०, खरबुज : १०-२०, पपई : ५-१५, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) : ५००-७००, सफरचंद : सिमला (२५ किलो) : २०००-२२००, काश्मीर डेलीशियस (१५ किलो) १२००-१५००.>आंब्याचीआवक वाढलीपुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात गुढीपाडव्या निमित्ताने रत्नागिरी हापूसची आवक वाढली असून, रविवारी फळविभागात ८०० ते १ हजार पेटी आंब्याची आवक झाली. बाजारात कच्च्या आंब्याच्या ४ ते ८ डझनाच्या पेटीस २ ते ४ हजार रुपये, तर पिकलेल्या आंब्याच्या पेटीला ४ ते ६ हजार रुपये भाव मिळाला. पाडव्यामुळे आंबाखरेदीसाठी ग्राहक बाजारात आले. मात्र, तयार माल उपलब्ध नसल्याने ग्राहकांची काहीशी निराशा झाली. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्याचा फटका आंबा उत्पादकांना बसत आहे. याबाबत अधिक माहिती देताना रत्नागिरी हापूसचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले की, हवामानात होत असलेला बदल आणि ओखी वादळाचा फटका बसल्यामुळे यंदा रत्नागिरी आंबा उशिरा बाजारात येत आहे. काही दिवसांमध्ये बाजारात सुमारे २०० ते २५० पेटी रत्नागिरी हापूसची आवक होती; मात्र रविवारी त्यामध्ये वाढ होऊन सुमारे८०० ते १ हजार पेटी आंब्याची आवक झाली.
फ्लॉवर, कोबी, मटार, महाग; दोडका, काकडी स्वस्त, तोतापुरी कैरीची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:25 AM